Monday, April 29, 2024
घरमानिनीतुमच्या बाळाला अंगठा तोंडात घालायची सवय आहे का ? मग अशी सोडवा...

तुमच्या बाळाला अंगठा तोंडात घालायची सवय आहे का ? मग अशी सोडवा सवय

Subscribe

अंगठा चोखल्याने लहान मुलांना सुरक्षित वाटतं. पण जरी त्यांना या सवयीमुळे सुरक्षित वाटत असलं तरी अनेक मुलांमध्ये ही सवय दिर्घकाळ राहते. पण या सवयीमुळे त्यांना अनेक आजार होण्याचा धोका असतो.

बऱ्याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. प्रामुख्याने ही सवय बालपणापासूनच जडते. लहान मुलांच्या अंगठा तोंडात घालण्यामागच्या सवयीमागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. की अंगठा चोखल्याने लहान मुलांना सुरक्षित वाटतं. पण जरी त्यांना या सवयीमुळे सुरक्षित वाटत असलं तरी अनेक मुलांमध्ये ही सवय दिर्घकाळ राहते. पण या सवयीमुळे त्यांना अनेक आजार होण्याचा धोका असतो. यामुळे मुलाची अंगठा तोंडात घालण्याची ही सवय सोडवण्याचा पालक प्रयत्न करत असतात. (Does your baby have a habit of putting his thumb in his mouth?)

ही सवय सोडण्यासाठी काही टीप्स

- Advertisement -

मुलांना ठराविक वेळेची सवय लावा
मुलाने तोंडात अंगठा घालण्यास सुरुवात करताच त्याला वेळेचे बंधन घाला. म्हणजे बेडरुम मध्ये गेल्यावर तो तोंडात अंगठा घालू शकतो पण बेडरुम बाहेर नाही.

अंगठा तोंडात घालणे ही वाईट सवय असल्याचे त्याला सतत सांगत जा

- Advertisement -

हवेत अनेक विषाणू असतात. ते हातावर बोटांवर अंगठ्यावरही असतात. त्यामुळे अंगठा तोंडात घातल्यानंतर ते पोटात जातात. यामुळे आजारपण येऊ शकते असेही मुलांना सागंत जा.

- Advertisment -

Manini