घरदेश-विदेशअमेरिकेत 8 महिन्यांच्या मुलीसह 4 भारतीय वंशाच्या नागरिकांचे अपहरण; पोलिसांकडून शोध सुरू

अमेरिकेत 8 महिन्यांच्या मुलीसह 4 भारतीय वंशाच्या नागरिकांचे अपहरण; पोलिसांकडून शोध सुरू

Subscribe

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या मर्सिड काऊंटीमधून सोमवारी 4 भारतीय वंशाच्या नागरिकांचे अपहरण झाले आहे. अपहरण झालेल्या लोकांमध्ये 8 महिन्यांच्या मुलीसह तिच्या आई – वडीलांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 36 वर्षीय जसदीप सिंग, 27 वर्षीय जसलीन कौर, त्यांची 8 महिन्यांची मुलगी आरुही ढेरी आणि 39 वर्षीय अमनदीप सिंग यांचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी संशयित आरोपी हे शस्त्रधारी आणि धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र संबंधित भारतीय नागरिकांचे त्यांच्या इच्छेविरुद्ध अपहरण करण्यात आले आहे.

आरोपींनी भारतीय वंशाच्या नागरिकांचे ज्या ठिकाणाहून अपहरण केले ती जागा दुकानं आणि रेस्टॉरंटने भरलेली आहे. अधिकाऱ्यांना अद्याप संशयित आरोपींची नावं आणि अपहरणाचा हेतू माहित नाही.

- Advertisement -

शेरीफच्या कार्यालयाने सोमवारी सांगितले, आम्ही जनतेला आवाहन करतो की, संशयित किंवा पीडित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काही माहिती असल्यास 911 वर कॉल करा. दरम्यान 2019 मध्येही तुषार अत्रे हे भारतीय वंशाचे टेक इंजिनियर त्याच्या मैत्रिणीच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळला होते. ते एका डिजिटल मार्केटिंग कंपनीचे मालक होते. त्याला त्याच्या शहरी कॅलिफोर्नियातील घरातून अटक करण्यात आली.


उत्तर काशीतील हिमस्खलनात अडकली 28 ट्रॅकर्सची टीम; मदतीसाठी लष्कराला पाचारण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -