Monday, May 6, 2024
घरमानिनीबाळाची मालिश कोणत्या तेलाने करावी ?

बाळाची मालिश कोणत्या तेलाने करावी ?

Subscribe

आपल्याकडे लहान बाळाला मालिश करण्याची पद्धत आहे. मालिश केल्याने बाळाचे स्नायू आणि हाड बळकट होतातं असे या मागचे कारण आहे.

आपल्याकडे लहान बाळाला मालिश करण्याची पद्धत आहे. मालिश केल्याने बाळाचे स्नायू आणि हाड बळकट होतातं असे या मागचे कारण आहे. त्यातही पूर्वी बाळाला घरातील ज्येष्ठ महिलाचं मालिश करायची पण आता बाळाच्या मालिशसाठी बायकाही उपलब्ध होतात. यामुळे बाळाला मालिश करण्याची जबाबदारी या बायकांवर सोपवली जाते. पण बाळाच्या मालिशसाठी नक्की कोणते तेल वापरायचे हे बऱ्याच जणींना माहित नसते. तर तज्ज्ञांच्या मते बाळाची मालिश या ५ तेलाने करावी.

ghee

- Advertisement -

तूप- तपाने मालिश केल्याने बाळाच्या शरीरात ऊब निर्माण होते. प्रामुख्याने हिवाळ्यात बाळाला तूपाने मालिश करावी.

- Advertisement -

खोबरेल तेल-नारळाचे म्हणजेच खोबऱ्याचे तेलाने मालिश केल्यास बाळाचे स्नायू बळकट होतात. त्वचाही तजेलदार होते.

मोहरी तेल- मोहरीचे तेल गरम असते. तसेच त्यात औषधी गुणही असतात. यामुळे बाळाच्या त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. हाडे मजबूत होतात.

बदाम तेल- बदाम तेलात अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे बाळाची त्वचा तजेलदार होते. हाडही बळकट होतात.

How-to-Use-Olive-Oil-for-Nails

ऑलिव्ह ऑईल-ऑलिव्ह ऑईलचे शरीराला जसे अनेक फायदे आहेत तसेच ते त्वचेलाही आहेत. या तेलामुळे बाळाच्या त्वचेचा रंग उजळतो. केसांची वाढ होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini