Monday, April 29, 2024
घरमानिनीघरच्या घरी लावा बाजारासारखे दही

घरच्या घरी लावा बाजारासारखे दही

Subscribe

डेली डाएटनुसार बहुतांश लोक दह्याचे सेवन करतात. दह्याच्या वापरामुळे आपल्या जेवणाला एक वेगळीच चव येते आणि त्याचसोबत हेल्दी सुद्धा राहतो. दरम्यान, मार्केट मिळणाऱ्या दह्यात भेसळ केलेली असते. त्यामुळेच बहुतांश लोक घरच्या घरी दही बनवणे पसंद करतात. अशातच तुम्हाला घरच्या घरी अधिक घट्ट आणि पातळ असे दही बनवायचे असेल तर पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवा.

-आंबट दह्याचा वापर करा
घरच्या घरी दही बनवायचे असेल तर तुम्ही आंबट दह्याचा वापर करु शकता. जेणेकरुन दही अधिक घट्ट होते. अशातच दूध गरम केल्यानंतर ते थंड करा. आता थोड्या गरम पाण्यात आधीच तुमच्याकडे असलेले दही टाका. त्यानंतर दुधाला ७-८ तासांसाठी झाकून ठेवा. असे केल्यानंतर आता तुम्हाला अधिक घट्ट दही मिळेल.

- Advertisement -

-दुधाची पावडर
अधिक घट्ट दही हवे असेल तर तुम्ही फुल क्रिम दुधाचा वापर करु शकता. तर फुल क्रिम दूध नसेल तर दही पातळ होते. अशातच दूध उकळवताना यामध्ये थोडीशी मिल्क पावडर टाकू शकता. यामुळे दूध घट्ट होईल आणि दही सुद्धा तसेच होईल.

- Advertisement -

-व्यवस्थितीत उकळा
दही घरच्या घरी बनवण्यासाठी ते व्यवस्थितीत उकळवणे फार गरजेचे असते. जेणेकरुन ते अधिक घट्ट होईल. यासाठी दूधाला २०० डिग्री फॅरेनहाइटवर जवळजवळ २० मिनिटांपर्यंत उकळवा. जर दूध अधिक प्रमाणात असेल तर ते खुप वेळ उकळवा. त्यानंतर दूध थोडं हलके कोमट झाल्यानंतर तु्म्हाला दही बनवण्यासाठी उत्तम असेल.

-दूध थंड करा
काही लोक गरम दूधातच दही तयार करतात. अशातच दूध उकळल्यानंतर ते थंड करुन घ्या.
जेणेकरुन दही उत्तम आणि स्वादिष्ट होईल.

-योग्य भांड घ्या
काही वेळा दुध उकळलेल्या भांड्यातच लोक दही लावतात. ज्यामुळे ते अधिक घट्ट होत नाही. त्याचसोबत दही जमा होण्यासाठी वेळ लागतो. अशातच दूध उकळल्यानंतर ते दुसऱ्या भांड्यात काढा. त्यानंतर त्यात आंबट दही टाकून ते दही करण्यासाठी लावा.

 


हेही वाचा: Kitchen Tips : तुमचा फ्रिज कूल होत नाही का ? ‘या’ टिप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini