पारंपरिक पदार्थांनपैकी एक महत्वाचा आणि अगदी सगळ्यांना आवडणारा हा गोड पदार्थ म्हणजे तांदळाच्या शेवया आणि नारळाचा रस. कोकण भागात या पदार्थाची जास्त रेलचेल असते. हा पदार्थ जास्त करून उन्हाळयात बनवला जातो.
तांदळाच्या शेवया शरीराला पोषक आहेत तसेच नारळाचे गोड पाणी आणि त्यातील स्तव हे शरीराला थंडावा देतात. यामुळेचा हा पदार्थ उन्हाळ्यात जास्त खाल्ला जातो. लुसलुशीत तांदळाच्या शेवया आणि नारळाचा गोड रस एकदा करून पाहाच. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या…
तांदळाच्या शेवया बनवण्यासाठी साहित्य:
१) ४ वाटया तांदळाचे पीठ
२) मीठ चवीनुसार
३) पाणी (तांदळाच्या पिठाच्या प्रमाणानुसार )
२) मीठ चवीनुसार
३) पाणी (तांदळाच्या पिठाच्या प्रमाणानुसार )
नारळाचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१) ओल खोबर २ वाटया
२) १ वाटी किसलेला गूळ
३) मीठ चवीनुसार
४) वेलची पूड
- Advertisement -
शेवया बनवायची कृती:
- तांदळाच्या पीठात मीठ व गरम पाणी घालून थोडे घट्ट मळून घ्यावे.
- एका पातेल्यात जास्तचे पाणी गरम करत ठेवावे.
- पाण्याला उकळी आली की पीठाचे लांबट गोळे करून त्यात सोडावे व १०-१५ मिनिटे उकडू दयावे.
- गोळे शिजले की ते शिजून वर येतात.
- हे गोळे गरमच शेवयाच्या सोऱ्यात(शेवयाच्या भांड्यात) घालून लगेचच शेवया पाडून घ्याव्यात.
नारळाचा रस बनवण्याची कृती:
- ओल खोबर थोडस पाणी घालून मिक्सला लावून त्याच दूध काढून घ्यावे.
- त्यात किसलेला गूळ, वेलची पूड व थोडेसे मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे.
- शेवया नारळाच्या रसासोबत सर्व्ह कराव्यात.
हेही वाचा :
- Advertisement -Kairi Chutney: तिखट गोड कैरीची चटणी,जाणून घ्या साहित्य आणि कृती