घरपालघरवाड्यात आधारभूत भात खरेदीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत

वाड्यात आधारभूत भात खरेदीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत

Subscribe

त्यातील ४९४ शेतकर्‍यांचीच आजपर्यंत ऑनलाईन नोंदणी झाली आहे. शासनस्तरावरून साधारण (धान)भाताला २१८३ रुपये तर अ दर्जाच्या भाताला २२०३ रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे.

वाडा: वाडा तालुक्यात केवळ भात हेच महत्वाचे एकमेव पीक असून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावरच येथील शेतकरी आपल्या संसाराचा गाढा चालवत असतात. तालुक्यात परळी, मानिवली, पोशेरी, गोर्‍हे, गुहीर, सारशी, कोनसई व कोंढले अशी आठ आधारभूत भात खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर अजूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणीच सुरू असून प्रत्यक्ष भात खरेदीला सुरुवात झाली नसल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधारभूत भात खरेदीला महिनाभर उशीर झाला असून तातडीने भात खरेदी सुरू करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत. दरवर्षी दिवाळी नंतर प्रत्यक्ष भात खरेदीला सुरुवात होते.मात्र यंदा दिवाळी होऊन एक महिना उलटला तरी आधारभूत भात खरेदी केंद्रांवर भात खरेदीला सुरुवात झालेली नाही. ऑनलाईन नावनोंदणी सुरू असून अनेक किचकट नियम असल्याने हेलपाटे मारूनच शेतकरी हैराण झाला आहे.कोंढले येथील आधारभूत भात खरेदी केंद्रावर एकूण ६६८ शेतकर्‍यांनी नावे दिली असून त्यातील ४९४ शेतकर्‍यांचीच आजपर्यंत ऑनलाईन नोंदणी झाली आहे. शासनस्तरावरून साधारण (धान)भाताला २१८३ रुपये तर अ दर्जाच्या भाताला २२०३ रुपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे.

केंद्रावर भात विक्रीसाठी बारदान संदर्भात शेतकरी संभ्रमित असून शासनस्तरावरूनच शेतकर्‍यांना भात खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून शेतकर्‍यांना बारदानाचा भुर्दंड बसणार नाही.
— प्रभाकर पाटील , शेतकरी (कोंढले)

- Advertisement -

येत्या ७ ते ८ दिवसांत शेतकर्‍यांना ४० किलो ७०० ग्रॅम वजन क्षमतेचे बारदान देऊन प्रत्यक्ष भात खरेदी केली जाईल.
— भास्कर पाटील, केंद्र चालक ,कोंढले आधारभूत भात खरेदी केंद्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -