घरताज्या घडामोडीऑनलाइन जेवण ऑर्डरवर आता प्रत्येक ऑर्डरमागे भरावे लागणार 'इतके' अतिरिक्त शुल्क

ऑनलाइन जेवण ऑर्डरवर आता प्रत्येक ऑर्डरमागे भरावे लागणार ‘इतके’ अतिरिक्त शुल्क

Subscribe

तुम्ही ऑनलाइन जेवण ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने सर्व वापरकर्त्यांकडून प्रति ऑर्डर 2 रुपये आकारण्याचा नियम लागू केला आहे. मात्र, प्रत्येक ऑर्डरनुसार हे शुल्क आकारले जाणार आहे.

तुम्ही ऑनलाइन जेवण ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने सर्व वापरकर्त्यांकडून प्रति ऑर्डर 2 रुपये आकारण्याचा नियम लागू केला आहे. मात्र, प्रत्येक ऑर्डरनुसार हे शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजे तुमच्या ऑर्डरच्या प्रमाणानुसार किंवा कार्ट मूल्यानुसार तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच तुम्ही कार्टमध्ये पाच वस्तू ऑर्डर करा किंवा फक्त एक ऑर्डर करा, तुम्हाला त्या बाबतीत फक्त 2 रुपये शुल्क द्यावे लागेल. (swiggy announced to charge rs 2 free per food delivery)

प्रति ऑर्डर 2 रुपये आकारले जाणार

- Advertisement -

मागील अनेक महिन्यांपासून फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला व्यवसायात सतत तोटा होत होता. ज्याचा खर्चाचा बोजा कंपनीवर वाढत होता. अशा स्थितीत खाद्यपदार्थाचा दर्जा सुधारण्याबरोबरच त्याची किंमत कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने प्रति ऑर्डर 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन फूड ऑर्डरवर 2 रुपये आकारण्याचा नियम सध्या बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये लागू आहे. मात्र, मुंबई आणि दिल्लीच्या वापरकर्त्यांना सध्या जास्त पैसे मोजावे लागत नाही.

मासिक कमाई 9 कोटींपेक्षा जास्त

- Advertisement -

स्विगीला दररोज 1.5 दशलक्षाहून अधिक ऑनलाइन ऑर्डर मिळतात. अशा परिस्थितीत, 2 रुपयांच्या शुल्कानुसार कंपनीला दररोज 30 लाख रुपये अतिरिक्त मिळतील. अशा प्रकारे कंपनी मासिक 9 कोटींहून अधिक कमाई करेल. अशा परिस्थितीत कंपनीला महसूल आघाडीवर दिलासा मिळू शकतो. जरी स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटो सध्या ऑनलाइन फूड ऑर्डरसाठी शुल्क आकारत नाही. येत्या काही दिवसांत झोमॅटोची किंमतही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’; म्हणाले, ही अनोखी पर्वणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -