घरताज्या घडामोडीरत्नागिरी पर्यटनासाठी MTDCची जाहीरात, नेटकऱ्यांनी बारसू रिफायनरीवरुन केले ट्रोल

रत्नागिरी पर्यटनासाठी MTDCची जाहीरात, नेटकऱ्यांनी बारसू रिफायनरीवरुन केले ट्रोल

Subscribe

मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी कोकणाची वाट धरली आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांतून चाकरमानी कोकणात जात आहेत. कोकणाचे सौदर्य डोळ्यांत टीपण्यासाठी रेल्वे गाड्याही प्रवाशी आणि पर्यटकांनी भरून जात आहेत. याच पर्यटकांना कोकणात आल्यावर अनेक पर्यटनस्थळ, विशेष म्हणजे रत्नागिरीतील पर्यटनस्थळ पाहायला मिळावी यासाठी MTDCने जाहीरात केली आहे.

मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी कोकणाची वाट धरली आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांतून चाकरमानी कोकणात जात आहेत. कोकणाचे सौदर्य डोळ्यांत टीपण्यासाठी रेल्वे गाड्याही प्रवाशी आणि पर्यटकांनी भरून जात आहेत. याच पर्यटकांना कोकणात आल्यावर अनेक पर्यटनस्थळ, विशेष म्हणजे रत्नागिरीतील पर्यटनस्थळ पाहायला मिळावी यासाठी MTDCने जाहीरात केली आहे. मात्र या जाहीरातींवरून नागरिकांनी सध्या कोकणात होऊ घातलेल्या प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्द्यावरून MTDCला ट्रोल केले आहे. (MTDC announcement for Ratnagiri tourism netizens trolled Barsu Refinery)

MTDCच्या जाहिरातीत काय?

- Advertisement -

ट्विटरच्या माध्यमातून MTDC ने रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची जाहिरात केली आहे. रत्नागिरीतील पर्यटनस्थळांचे फोटे शेअर करत कोकणातील एक अमुल्य रत्न म्हणजे रत्नागिरी तुम्ही येत्या काही दिवसात रत्नागिरीला भेट देण्याचा विचार करत असाल. तर मग तुम्ही नक्कीच या मार्गदर्शक मालिकेप्रमाणे जायला हवे. लवकरात लवकर तुमच्या सुट्टीची योजना करा आणि सर्वोत्तम मुक्कामाचा अनुभव घेण्यासाठी एमटीडीसी गणपतीपुळे येथे.

मात्र, या जाहीरातीवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “इथे एवढं कौतुक करत आहात कोकणचं. मग तुमची भूमिका स्पष्ट करा आणि उघड विरोध करा. एकीकडे कोकणात काय आहे ते सांगता आणि दुसरीकडे आपलेच सरकार जे आहे ते घालवायच्या मागे लागलं आहे”, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने MTDCच्या या जाहीरातीवर निशाणा साधला.

- Advertisement -

याशिवाय, रिफायनरी झाली तर हे सगळं टिकेल का? तुमची साईट आणि जॉब राहील का? मग काय पोस्ट करणार तुम्ही, ***? असे सवाल उपस्थित करत एका नेटकऱ्याने संताप व्यक्त केला.


हेही वाचा – ‘राऊत, अंधारेंना उत्तर देण्यासाठी आम्ही रिकाम टेकडे नाही’, उदय सामंतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -