Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipRelationship: कोणतेही कारण न देता घटस्फोट घेता येतो?

Relationship: कोणतेही कारण न देता घटस्फोट घेता येतो?

Subscribe

जगभरात घटस्फोटाची प्रकरणं वाढत आहेत. अमेरिकेतील या संदर्भातील स्थिती पाहिल्यास तेथे वर्षाला साडेचार मिलियन लग्न मोडले जातात. त्यापैकी 50 टक्के नाती ही घटस्फोटामुळे मोडली जातात. घटस्फोट ही एक दीर्घकाळ चालणारी प्रोसेस असते. यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुनच घटस्फोट मिळवला जातो. याच समस्येपासून दूर राहण्यासाठी काही देशांनी No Fault Divorce ला मंजूरी दिली आहे. यामध्ये कोणीही एकमेकांच्या चुका न काढता एकमेकांपासून विभक्त होऊ शकतात.

नो फॉल्ट डिवोर्स जगासाठी ही एक नवी कॉन्सेप्ट असेल. पण रशियात यालाच शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.1917 मध्ये बोल्शेविक क्रांति झाली. व्लादिमीर लेनिन याचे नेते होते. त्यांनी देशाला आधुनिक बनवण्याची जबाबदारी घेतली होती. यामध्ये सुरुवातीला रशियन ऑर्थोडॉक्स चर्च लग्न आणि विभक्तेची काळजी घ्यायचे. त्यांचे असे म्हणणे होते की, डिवोर्स सारखी कोणतीही गोष्ट नसते. कपल्स नाशुख राहून सुद्धा लग्नाच्या बंधनात अडकलेले असायचे. केवळ अगदीच वादाची स्थिती निर्माण झाल्यास घटस्फोट मिळायचा. जसे की, मारहाण.

- Advertisement -

बोल्शेविक क्रांतिनंतर लगेच लग्नाला धार्मिक रुप दिले गेले. लग्न तेव्हा सुद्धा पवित्र मानले जायचे. पण त्यात एखाद्याने जबरदस्तीने रहावे असे काही नव्हते. रशियन रजिस्ट्री ऑफिसमध्ये कपल्स आम्हाला विभक्त व्हाययचे आहे यासाठी अर्ज करायचे. तीन दिवसातच त्यांना नोटीस धाडली जायची आणि घटस्फोटाचा निर्णय लगेच व्हायचा.

- Advertisement -

यामध्ये आरोप-प्रत्यारोप, भांडण-वाद फार कमी व्हायचे. परंतु एक समस्या होती ती म्हणजे जर कपलला मुलं असेल तर त्याची जबाबदारी नेहमीच आईवर यायची. वडिल त्याला सपोर्ट करतील अथवा नाही यामध्ये कोर्ट दखल देत नसे. लग्न मोडण्याची प्रकरणे त्यामुळे वेगाने वाढू लागली होती. जोसेफ स्टालिन हे सत्तेत आल्यानंतर घटस्फोटाच्या या आधुनिक सिस्टिमला त्यांनी परिवारात फूट पाडण्यासारखे असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली. पण आता ही घटस्फोटी प्रोसेस अन्य देशात कायम आहे.

खरंतर नो-फॉल्ट डिवोर्समध्ये नवरा किंवा बायकोला कोणतेही स्पष्टीकरण किंवा हे सत्य करायचे नसते की, कोण किती चुकीचे आहे. केवळ हेच सांगायचे असते की, आम्हाला आता नाते मोडायचे आहे. बहुतांश देशात घटस्फोट फॉल्ट थ्योरीवर आधारित आहे. त्यानुसार एक पक्ष तो पर्यंत दुसऱ्याच्या चुका काढणार नाही जो पर्यंत घटस्फोट मिळत नाही. या प्रोसेस मध्ये एक पक्ष खोटे पुरावे जमा करतो जेणेकरुन विभक्त होता येईल. अशातच दोन्ही पक्षाला अधिक त्रास होतो आणि याचा फटका मुलाबाळांना ही बसतो. काही देशात या फॉल्ट थ्योरीला नो-फॉल्ट मध्ये बदलत आहेत. जेणेकरुन अशा समस्या येऊ नयेत.

नो-फॉल्ट डिवोर्सला सध्या युके व्यतिरिक्त अमेरिकेतील बहुतांश राज्य, चीन, माल्टा, स्वीडन, स्पेन आणि मॅक्सिको मध्ये मंजूरी मिळाली आहे. स्वीडनमध्ये याबद्दल थोडा संभ्रम आहे. तर नो-फॉल्ट डिवोर्समध्ये दोन्ही पक्ष यासाठी तयार असले पाहिजेत. त्यानंतर कोर्ट थोडा वेळ देते, जेणेकरुन ते आपापसात यावर तोडगा काढतील. असे न झाल्यास किंवा आधीपासूनच विभक्त राहत आहेत ते म्युचअल डिवोर्स घेऊ शकतात.


हेही वाचा- दीपिका रणवीर घेत आहेत जुन्या पिढीकडून relationship चे धडे

- Advertisment -

Manini