Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationshipParenting Tips: तुमचे मुलं रात्रभर झोपत नसेल तर 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करु...

Parenting Tips: तुमचे मुलं रात्रभर झोपत नसेल तर ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करु नका

Subscribe

मुलांसोबत एखादी घटना घडली की ते पटकन विसरत नाही. घरात सतत आई-वडिलांचे होणारे वाद, भांडण, एखादी दुर्घटना होताना पाहणे अथवा त्यांच्या आवडीच्या व्यक्तींना गमावल्याने त्यांच्या मनावर ही नकारात्मक परिणाम होतो. अशातच ते आपल्याला काय वाटतेय हे सुद्धा स्पष्टपणे सांगत नाहीत.

एकमेकांसोबत खेळणे बंद करणे, ऐकटे एकटे राहणे अशा काही गोष्टी ते करतात. अशातच पालकांनी त्यांच्यात होणारे बदल ओळखले पाहिजेत. जेणेकरुन मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही. तुमचे मुलं त्रस्त असेल किंवा एखाद्या ट्रॉमामधून जात असेल तर तुम्ही पुढील संकेतांवरुन ओळखू शकता.

- Advertisement -

-मुलांच्या वागण्यात बदल
ट्रॉमामध्ये असताना मुलांच्या शारिरीक, भावनात्मक आणि सोशल फंक्शनिंगवर वाईट परिणाम होतो. जर तुमचे मुलं दुसऱ्यांसोबत खेळण्यापासून दूर राहत असेल, बाहेर जाण्यास नकार देत असेल तर अलर्ट व्हा. तुमच्या मुलाच्या वागण्यावर लक्ष द्या. तो कसा वागतोय अथवा त्याच्या वागणूकीत काही निगेटिव्ह दिसत असेल तर तज्ञांना जरुर भेटा.

-एंजायटीचे लक्षण
ट्रॉमाच्या कारणास्तव मुलांमध्ये एंजायटीची लक्षणं दिसून येतात. ही एक कॉमन समस्या आहे. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थनुसार 13-18 वयातील टीनएज मुलांमध्ये जवळजवळ तीन पैकी एक मुलं एंजायटी डिसऑर्डरने ग्रस्त असतात. अशातच मुलांना सकारात्मक वातावरणात घेऊन जा अथवा त्याला सपोर्ट देत ट्रॉमा मधून बाहे काढण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

-मुलांना झोप न येणे
ट्रॉमाच्या स्थितीत असल्याने काही वेळेस मुलं रात्र रात्रभर झोपत नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर आणि मनात त्याच गोष्टी समोर येत राहतात. यामुळेच त्यांची झोप पूर्ण होत नाही. रात्री झोपताना तो रडतो, एकटे झोपत नसेल तर या संकेतांना हलक्यात घेऊ नका.

-चिडचिड होणे
ट्रॉमा मधून जात असलेली मुलं चिडचिड करु शकतात. काही वेळेस मुलं प्रत्येक गोष्टीवरुन रडू लागते. त्याला असुरक्षित वाटू लागते. त्याला असे वाटत राहते की आपले पालक त्याला सोडून जाऊ नयेत. जर तुमचे मुलं सतत रडत असेल तर पालकांनी या संकेताकडे दुर्लक्ष करु नये.

पालकांनी काय करावे?
-मुलांना एकटे सोडू नका आणि त्याच्याशी बोलत रहा
-त्याला समजावून सांगा की तुम्ही त्याच्यासोबत आहात
-भावनात्मक पाठिंबा देण्याचा प्रयत्न करा
-त्याच्यासोबत एखादी ट्रिप प्लॅन करा
-जे मुलाला करायला आवडते ते त्याला करु द्या
-ऑफिसला जात असाल तर त्याच्यासोबत राहू द्या
-तज्ञांचा किंवा काउंसिलरची मदत घ्या


हेही वाचा- Parenting: 1-3 वर्षाच्या मुलांना अशी शिकवा शिस्त

- Advertisment -

Manini