Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionचेहऱ्याला सूट होईल असे झुमके कसे निवडायचे? वाचा

चेहऱ्याला सूट होईल असे झुमके कसे निवडायचे? वाचा

Subscribe

सुंदर आणि फॅशनेबल (fashion) दिसणे आपल्या सर्वांनाच आवडते. पण, फॅशन ट्रेंड्सनुसार, काही गोष्टी तुम्ही खरेदी करत असतो. यात ट्रेंडी गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्या म्हणजे कानात घालणारे झुमके (jhumke) हे कधीच आऊट ऑफ ट्रेंड जात नाहीत.

तुम्हाला माहिती आहे का? की, झुमके हे नेहमीच एवरग्रीन फॅशनचा भाग का आहेत. त्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार समजून घ्या की, तुमच्यावर कोणते झुमके तुमची सुंदरता खुलवू शकतात.

- Advertisement -

यासाठी आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सनुसार, तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार झुमके कसे निवडावे. त्यासोबतच ते झुमके कसे स्टाईल करण्याच्या काही टिप्स देखील देणार आहोत.

 

- Advertisement -

गोल चेहऱ्यासाठी ‘हे’ झुमके

गोल चेहरा फार चबी असतो आणि या चेहऱ्यावर मोठे आणि जड झुमके जास्त सुंदर दिसतात. तुमचा चेहरा देखील हॅवी आणि लांब चॅन स्टाईलचे झुमके खूप सुंदर दिसतात. या झुमक्यांनी तुमचा चेहरा डिफाइन करण्यास मदत करते. यामुळे तुमचा लूक सुद्धा attractive दिसतो. तुम्ही तुमचे केस ओपन स्लिक हेअर स्टाइल करू शकता.

छोट्या चेहऱ्यासाठी ‘हे’ झुमके खाला

तुमचा चेहरा जर छोटा असेल, तर तुम्ही रुंद झुमके घालावे. यासारखे झुमके तुमचा चेहऱ्याला आणि जॉ-लाइनला शार्पनेसने करण्यास मदत करेल आणि तुमच्या लूक खूप क्यूट दिसेल. यासारख्या लुकसोबत तुम्ही बन हेअर स्टाइल करू शकतात. यामुळे चुमचा चेहरा अजून खुलून दिसेल.

 

लांब चेहऱ्यासाठी ‘हे’ झुमके वापरा

तुमचा चेहरा लांब आणि ऑवल शेपचा असेल, तर तुम्ही सर्वात छोटे साइजचे झुमके घालावे. यासारखे मिळते-जुळते झुमके तुम्हाला मार्केटमध्ये जवळपास 50 रुपयापासून ते 100 रुपयांपर्यंत सहज मिळतील. या झुमक्यांसोबत तुम्ही इंडो-वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल लुकसोबत हे झुमके स्टाइल करू शकता. त्यासोबत तुम्ही तुमचे केस ऑपन वेवी हेअर स्टाइल देखील करू शकतात.


 

हेही वाचा – मोगऱ्याच्या गजऱ्याला कंटाळलात तर; वापरा ‘या’ फुलांचे गजरे

- Advertisment -

Manini