घरदेश-विदेशModi Government 9 Years : लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी... पंतप्रधान मोदींचे ट्वीट

Modi Government 9 Years : लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी… पंतप्रधान मोदींचे ट्वीट

Subscribe

नवी दिल्ली : आपल्या सरकारला नऊ वर्षे (Modi Government 9 Years) पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्वीट केले आहे. ही नऊ वर्षं सेवेची (9 Years Of Seva) असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत घेतलेला प्रत्येक निर्णय ‘लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीनेच’ घेण्यात आला. ‘आज आपण देशसेवेची 9 वर्षे पूर्ण करत असताना, माझे मन नम्रता आणि कृतज्ञतेने भरले आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती लोकांचे जीवनमान उंचवण्याचा मानस ठेवूनच घेण्यात येतो. आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू. विकसित भारत घडवूया.’ पंतप्रधान मोदी यांनी या ट्वीटला 9 ईयर्स ऑफ सेवा (9 Years Of Seva) असा हॅशटॅग दिला आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा पदाची शपथ घेतली. त्याचे औचित्य साधून भाजपाने मंगळवारपासून देशभरात व्यापक ‘विशेष संपर्क अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. ‘राष्ट्र प्रथम’ (Nation First) हा मंत्र घेत देशाने गेल्या नऊ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात “अभूतपूर्व” विकास केला आहे. सरकारने हाती घेतलेल्या देशाच्या सर्वांगीण विकासामुळे “21वे शतक हे भारताचे आहे,” असे जगभरातील प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषक मानतात, असे निवेदन भाजपाने जारी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यांनी या नव्या वास्तूचे वर्णन “लोकशाहीचे मंदिर” म्हणून केले आणि त्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या काही कामगारांचा गौरव देखील केला. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी लोकसभेच्या दालनात ऐतिहासिक सेंगोलचीही स्थापना केली. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होत नसल्याबद्दल विविध 20 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात, त्यांनाच डावलून होत असलेल्या या सोहळ्यावर बहिष्कार असल्याचे संयुक्त निवदेन 20 पक्षांनी जारी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -