Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousSomvati Amavasya 2024 : आज सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी करा हे...

Somvati Amavasya 2024 : आज सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी करा हे उपाय

Subscribe

आज 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षातून एक किंवा दोन वेळाच सोमवती अमावस्येचा शुभ योग बनतो. त्यामुळे या शुभ योगात तीर्थ स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. सोमवती अमावस्येचे महत्त्व महाभारतात भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला सांगितल्याचे वर्णन आहे. हा दिवस पितृ दोषाचे उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हे उपाय केल्यास नक्कीच पितृ दोष कमी होऊ शकतो.

पितृ दोष कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

1,700+ Shiva Lingam Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | Hinduism

- Advertisement -
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही तीर्थ स्नानवर जाऊन पितरांचे श्राद्ध, तर्पण करा. पूजेनंतर गरजू व्यक्तींना जेवण, धान्य, भांडी, कपडे इ. वस्तू दान करा. हे उपाय केल्यास तुमचे पितृ देवता तुमच्यावर खूप खूश होतील.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच माशांसाठी नदी किंवा तलावामध्ये कणकेचे लहान लहान गोळे बनवून पाण्यामध्ये सोडा. या उपायामुळे तुमच्या पितरांना शांती मिळेल.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी दूधामध्ये काळे तीळ आणि पाणी घालून पिंपळाच्या झाडाला घाला. यासोबतच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला.
  • या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या किंवा राईच्या तेलाचा दिवा लावा.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करा. शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडिचे दर्शन घ्या. या उपायाने तुमचा पितृ दोष कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा : 

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत करा देवीच्या ‘या’ प्रभावी मंत्रांचा जप

- Advertisment -

Manini