Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthBlue Mind Relaxation : ब्लू माईंड रिलॅक्ससेशन का आहे गरजेचे?

Blue Mind Relaxation : ब्लू माईंड रिलॅक्ससेशन का आहे गरजेचे?

Subscribe

रोजच्या रुटीनमुळे थकल्यानंतर फ्रेश होण्यासाठी आणि स्ट्रेसवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेकजण व्यायाम, ध्यान किंवा प्रवास करतात. पण, थोड्यावेळाने पुन्हा आपल्याला स्ट्रेस आणि थकवा जाणवायला सुरुवात होते. अशावेळी ब्लु माईंड रिलॅक्ससेशन उपयोगी ठरू शकते. खरं तर पाण्याचा आवाज आणि त्याचा थंडावा सुख – शांती वाढविण्यास मदत करतो. मन रिलॅक्स ठेवण्यासाठी पाणी हा एक प्रभावी मार्ग आहे.

ब्लु माईंड म्हणजे काय?

- Advertisement -

पाणी, तलाव, नद्या, झरे माणसाच्या मनाला आनंद देतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा लोक पाण्याच्या जवळ किंवा पाण्यात जातात. तेव्हा त्या अवस्थेला ब्लु माईंड रिलॅक्ससेशन असे म्हणतात. ब्लु माईंड रिलॅक्ससेशनमुळे शरीराला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने फायदा होतो. डॉक्टरांच्या मते, थकलेल्या दिवसानंतर पाण्याच्या जवळ येताच थंडावा जाणवतो आणि मनात आनंद लहरी निर्माण होतात. तुम्ही जेव्हा पाण्याकडे पाहता तेव्हा डोपामाईन आणि सेरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात, जे तुमच्या मानसिक आरोग्यास चालना देण्यास मदत करतात.

ब्लु माईंड ऍक्टिव्ह करण्याचे मार्ग –

- Advertisement -

पाणी प्या – ब्लु माईंड हे शांततेचे प्रतीक आहे आणि ते ऍक्टिव्ह करण्यासाठी हायड्रेट राहणे खूप महत्वाचे आहे. खरं तर डिहायड्रेशनमुळे शरीराला थकवा, अशक्तपणा आणि स्ट्रेस जाणवू लागतो. यासाठी नियमित पाणी प्या.

स्विमिंग – योगाप्रमाणे मन रिलॅक्स ठेवण्यासाठी स्विमिंग उपयुक्त ठरते. स्विमिंग केल्याने मन शांत होते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ब्लु माईंड थेरपीसाठी थोडा वेळ तुम्हाला पाण्यात जावे लागेल. पाण्यात गेल्यावर खोल श्वासोच्छवासाची प्रॅक्टिस करा आणि हे करताना स्नायू ताणण्याचा प्रयन्त करा.

ऍक्वेरिअम – संशोधनानुसार 10 मिनिटे ऍक्वेरिअम पाहिल्यास स्ट्रेस कमी होतो आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या जाणवत नाही. पाण्यातील मासे पाहिल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटते. परिणामी, शांत झोप लागण्यास मदत होते.

बीच वॉक – तज्ज्ञांच्या मते, मूड स्विंग्स आणि वाढत्या स्ट्रेसवर मात करण्यासाठी दिवसभरातुन थोडा वेळ काढून बीचवर पाण्यामधून चाला. यामुळे शरीरात एनर्जी वाढते आणि मनःशांती लाभते.

ब्लु माईंडचे फायदे –

वाढते स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी होतो. ज्याने व्यक्तीला रिलॅक्स वाटते.

पाण्याजवळ काही वेळ बसणे, चालणे, स्विमिंग यामुळे समस्या सोडविण्याचे कौशल्य वाढते.

पाण्याजवळ जास्तीत जास्त वेळ घालविल्याने तुम्ही आनंदी होता.

पाण्याचा आवाज आणि स्पर्श नाडीचा वेग नियंत्रीत करतो आणि तुम्हाला रिलॅक्स वाटते.

 

 

 

 

 


हेही पहा :  Breakfast Time : सकाळचा नाश्ता करण्याची ही आहे योग्य वेळ

 

- Advertisment -

Manini