घरदेश-विदेशLok Sabha 2024: मोदींच्या मतदारसंघात मतांचा झोल? निवडणूक आयोगाने सांगितली वस्तुस्थिती

Lok Sabha 2024: मोदींच्या मतदारसंघात मतांचा झोल? निवडणूक आयोगाने सांगितली वस्तुस्थिती

Subscribe

Lok Sabha 2024: 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी ज्या वाराणसीच्या जागेवरून निवडणूक लढवतात त्या जागेवर मतांचा झोल झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यासंदर्भातील पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. इतकंच नव्हे तर 2019 मध्ये 373 लोकसभेच्या जागांवर फसवणूक झाल्याचंही म्हटलं जात आहे. याच संदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोदाने आकडेवारीसह वस्तुस्थिती सांगितली आहे. (Lok Sabha Election 2024 Vote swing in Narendra Modi s constituency Seat Varanasi The facts stated by the Election Commission)

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, अनेक संसदीय मतदारसंघांमध्ये EVM वरून मोजण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या जास्त होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने (ECI) यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयोगाने हे अहवाल फेटाळून लावले आणि त्यांना बनावट म्हटले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने ट्विट केले की, “2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 373 लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदार आणि ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांमध्ये तफावत असल्याचा निवडणूक आयोगाच्या पत्राचा हवाला देत खोटा दावा केला जात आहे. असे दावे दिशाभूल करणारे, बनावट आणि निराधार आहेत. निवडणूक आयोगाने अशी कोणतीही माहिती पुरवलेली नाही.

दुसऱ्या पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, 2019 मध्ये वाराणसी मतदारसंघ जो पंतप्रधान मोदींचा गड आहे त्यात मतदारांची संख्या आणि ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांच्या संख्येत तफावत होती. यावर निवडणूक आयोगानेही प्रतिक्रिया दिली आहे. हा दावा दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचे आयोगाने म्हटले आहे. वाराणसीमध्ये एकूण 18 लाख 5 हजार 791 मतदार होते आणि ईव्हीएममध्ये एकूण 10 लाख 58 हजार 744 मते पडली आणि मोजली गेली. याशिवाय 2085 जणांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले होते.

- Advertisement -

याआधीही फेक पोस्ट व्हायरल

याआधीही हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोग 350 रुपये कापणार असल्याचा दावा करण्यात आला होता. जर तुमचे खाते नसेल तर तुमच्या मोबाईलमधून पैसे कापले जातील, अशाही अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

याशिवाय व्हॉट्सॲप या सोशल मेसेजिंग साइटवरही एक संदेश प्रसारित करण्यात आला. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, यावेळी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार नाही. मात्र, निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं म्हटलं आहे.

१९ एप्रिलला मतदान

देशभरात लोकसभेच्या 543 जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी आणि 13 मे रोजी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर 20 मे रोजी पाचव्या टप्प्यासाठी, 25 रोजी सहाव्या टप्प्यासाठी आणि 1 जून रोजी सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होतील.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: जे बोलाल ते विचार करून बोला; थोरातांचा राऊतांना सल्ला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -