घरदेश-विदेशचांद्रयान-3 स्वप्नपूर्तीच्या अखेरच्या टप्प्यात; चंद्राच्या आणखी जवळ पोहचलं विक्रम लँडर

चांद्रयान-3 स्वप्नपूर्तीच्या अखेरच्या टप्प्यात; चंद्राच्या आणखी जवळ पोहचलं विक्रम लँडर

Subscribe

चंद्राच्या ऑर्बिटमध्ये आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक संथ प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू (पेरिल्युन) 30 किमी अंतरावर आहे, तर सर्वात दूरचा बिंदू (अपोलून) 100 किमी अंतरावर आहे. ISROने दिलेल्या माहितीनुसार, लँडर यशस्वीरित्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले आहे आणि गंतव्यस्थानाकडे रवाना झालं आहे.

चांद्रयान-3 चं विक्रम लँडर, प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं होऊन आता चंद्राच्या दिशेने जात आहे. विक्रम लँडर डी-बूस्टिंग प्रक्रियेतून जाण्यासाठी सज्ज आहे. डी-बूस्टिंगची प्रक्रिया दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झाली आहे. चंद्राच्या ऑर्बिटमध्ये आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक संथ प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू (पेरिल्युन) 30 किमी अंतरावर आहे, तर सर्वात दूरचा बिंदू (अपोलून) 100 किमी अंतरावर आहे. (Chandrayaan 3 in final stages of dream fulfilment Vikram lander reached closer to the Moon Lunar Orbit)

ISROने दिलेल्या माहितीनुसार, लँडर यशस्वीरित्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले आहे आणि गंतव्यस्थानाकडे रवाना झालं आहे. चांद्रयान-३ मिशनच्या लँडरला विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यांना भारतीय अंतराळाचे जनक मानले जाते.

- Advertisement -

चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्याच्या नियोजित लँडिंगच्या एक आठवडा आधी म्हणजे बुधवारी या अंतराळ यानाने चंद्राच्या अंतिम कक्षेच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. आता हे चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे.

चांद्रयान-3 हळूहळू चंद्राकडे सरकतंय

अंतराळ यान प्रक्षेपित करण्यासाठी GSLV मार्क 3 (LVM-3) हेवी-लिफ्ट प्रक्षेपण वाहन वापरण्यात आले, जे 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यात आले. हे यान गेल्या अनेक आठवड्यांपासून चंद्राच्या दिशेने जात आहे. ISRO कडून 14 जुलै रोजी चांद्रयान-3 हे प्रक्षेपित करण्यात आले होते.

- Advertisement -

इस्रो इतिहास रचण्यासाठी सज्ज

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात आले. इस्रो चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान-३ चे लँडिंग यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

हे आहे विक्रम लँडरचे काम?

भारताच्या तिसर्‍या या मोहिमेचा उद्देश चांद्रयान-३ चा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग आहे. विक्रम रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर नवीन संशोधन करणार आहे. त्याच वेळी, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत फिरेल आणि चंद्रावर लक्ष ठेवेल.

( हेही वाचा: आर्थिक लाभासाठी काही डॉक्टर आपला पेशा बदनाम करतायत, ओरिसा हायकोर्टाची टिप्पणी )

चांद्रयान-३ कडून मोठ्या अपेक्षा का आहेत?

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी गेल्या आठवड्यात चांद्रयान 3 वर सांगितले की सर्व काही योजनेनुसार सुरू आहे. चेअरमन एस सोमनाथ म्हणाले, ‘सगळं सुरळीत सुरू आहे. 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेपर्यंत हे यान अनेक संदेश पाठवणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हा या यानाचा मुख्य उद्देश आहे.

चंद्राचा दक्षिणेकडील भाग हा जगासाठी अज्ञात राहिला आहे. चांद्रयान-3 त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -