घरताज्या घडामोडीMaratha Reservation: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; मराठा आरक्षणावर चर्चेची...

Maratha Reservation: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; मराठा आरक्षणावर चर्चेची शक्यता

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) शनिवारी भेट घेतली. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा ऐरणीवर असताना राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा दुसरा अध्याय 25 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठवाड्यातील गावागावांमध्ये साखळी उपोषण सुरु झाले आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही मिळत आहे. शुक्रवारी रात्री विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात एक एसटी बस आंदोलकांनी पेटवून दिली आहे. आरक्षणाशिवाय दुसरं काहीही नको असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आंदोलनाचा दुसरा टप्पा: उद्यापासून हजारो लोकांनी आमरण उपोषणात सहभागी व्हा; जरांगे पाटलांचं आवाहन

मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते, की सरकारने त्यांना 30 दिवसांचा शब्द दिला होता. आंदोलकांनी त्यांनी आणखी दहा दिवस दिले. या 40 दिवसांमध्ये सरकारने निर्णय घेणे आपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी शक्य असेल तेच आश्वासन आंदोलकांना दिले असेल, असे शरद पवारांनी म्हटले होते.

- Advertisement -

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मनोज जरांगे यांनी रविवारपासून साखळी उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी मराठा बांधवांना पाणी प्राशन करुन आमरण उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत गावागावांत आंदोलन सुरु होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणासंबंधी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

शाळा दत्तक योजनेला राष्ट्रवादीचा विरोध

मंत्री दीपक केसरकर यांच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने राज्यात समूह शाळा आणि शाळा दत्तक योजना आणण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेला शरद पवार यांनी विरोध दर्शवला आहे. यासाठी नाशिकमधील एका शाळेचे उदाहरण ते प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात देत आहेत. नाशिकमधील जिल्हा परिषदेची एक शाळा मद्य व्यवसायिकाला दत्तक देण्यात आली आहे. त्या शाळेच्या आवारात नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शाळा दत्तक योजनेमुळे खासगी लोकांना शाळेच्या जागेचा मनमानी पद्धतीने वापर करता येणार आहे. शाळेच्या प्रशासनावर, शिक्षकांवर, कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण येणार आहे. यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांची कपात होण्याची भीती शरद पवार सध्या व्यक्त करत आहेत. शाळा दत्तक योजनेवरही या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता, व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -