घरपालघरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पालघरमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पालघरमध्ये

Subscribe

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी आमदार विलास तरे यांना उमेदवारी द्यायची असल्याचे सांगितले जाते.

शशी करपे,वसई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानानिमित्ताने शनिवारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शनिवारी मनोर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करून शिवसेनेकडून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावीत विद्यमान खासदार आहेत. यावेळी भाजप मतदारसंघासाठी आग्रही आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे केंद्रीय आणि राज्यातील मंत्री तसेच नेते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात हजेरी लावत असल्याचे दिसत आहेत. भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संतोष जनाठे यांच्या नावाची शिफारस केल्याचे सांगितले जाते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी आमदार विलास तरे यांना उमेदवारी द्यायची असल्याचे सांगितले जाते.

एकीकडे, भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु असताना शिंदे गटात मात्र ताळमेळ दिसत नाही. संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी रविंद्र फाटक यांच्याकडे असली तरी तेही जिल्ह्यात फारसे फिरताना दिसत नाहीत. वसई आणि मनोर येथे अधूनमधून निवडक पदाधिकार्‍यांच्या बैठका घेण्यापलिकडे शिंदे गटाचे वरिष्ठ नेते फारसे सक्रीयपणे कार्यरत नाहीत. खासदार राजेंद्र गावीत यांनी काही महिन्यांपासून विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम केले आहे. गावीत गावोगावी फिरत असले तरी शिंदे गट मात्र तितकासा सक्रीय असल्याचे दिसत नाही. परिणामी खासदार गावित एकांगी किल्ला लढवण्याचे काम करताना दिसत आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून काही खासगी यंत्रणांना दिले गेले होते. त्याचा अहवाल शिंदे गटासाठी फारसा दिलासादायक नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे जातीने लक्ष घालत असले तरी ठाणे आणि मुंबईतील नेते जबाबदारीने काम करत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे.

- Advertisement -

दरम्यान, ही परिस्थिती पाहता आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरकडे लक्ष देणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शिवसंकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा आहे. मनोर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात जोरदार शक्तीपदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना बळ देण्याचे काम करणार आहेत. त्याचबरोबर भाजपला पक्षाची ताकद दाखवण्याचे काम केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -