Sunday, June 11, 2023
घर मानिनी Religious दुर्भाग्य दूर करण्यासाठी सकाळी उठताच करा 'या' गोष्टी

दुर्भाग्य दूर करण्यासाठी सकाळी उठताच करा ‘या’ गोष्टी

Subscribe

हिंदू शास्त्रानुसार आपले भाग्य मजबूत करणं आपल्याच हातात असतं. शास्त्रातील काही उपायांनी आपण आपले भाग्य मजबूत करू शकतो

आपल्या आयुष्यात आपल्या भाग्याची साथ असणे आपल्यासाठी खूप उपयोगी पडते. आपले भाग्य जर चांगले असेल तर आपल्याला आयुष्यात जास्त समस्यांचा सामना करावा लागत नाही. मात्र भाग्य जर कमजोर असेल तर अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकजण खूप मेहनत करूनही त्यांना हवे तेवढे यश मिळत नाही, असं म्हणतात की अशावेळी त्या व्यक्तींचे भाग्य कमजोर असते. हिंदू शास्त्रानुसार आपले भाग्य मजबूत करणं आपल्याच हातात असतं. शास्त्रातील काही उपायांनी आपण आपले भाग्य मजबूत करू शकतो.

भाग्य मजबूत करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

तळहाताचे दर्शन घ्या
सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात एकत्र जोडून, दोन्ही हाताच्या मध्यभागी बघत ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।’ या मंत्र म्हणा. त्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून हाताचे दर्शन घ्या. असं म्हणातात की, आपल्या दोन्ही हातांमध्ये देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि विष्णूचा वास असतो.

- Advertisement -

सूर्याला अर्घ्य द्या
सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यावर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. या उपायाने सूर्य देव तुमच्यावर प्रसन्न होतात, ज्यामुळे तुमचे भाग्य मजबूत व्हायला मदत होते.

हर किसी को नहीं करें प्रणाम या नमस्कार, शास्त्रों में इन लोगों को वर्जित है अभिवादन - do not greet these people it is forbidden in the scriptures know about greetings rules –गायत्री मंत्राचा जप करा
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार गायत्री मंत्राचा जप केल्याने आयुष्यात अनेक सकारात्नक गोष्टी पाहायला मिळतात.

- Advertisement -

इष्ट देवतेची पूजा करा
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दररोज इष्ट देवतेची पूजा करा. यांची पूजा केल्याने त्यांचे आर्शिवाद आपल्याला प्राप्त होतात.


हेही वाचा :

Vastu Tips : दुसऱ्यांकडे ‘या’ 3 गोष्टी मागितल्याने वाढते दारिद्र्य

- Advertisment -

Manini