हिंदू धर्मात दान करण्याला खूप महत्त्व दिले आहे. दानधर्म करणे अत्यंत पुण्याचे काम असल्याचे म्हटले जाते. भारतात अनेकजण आपल्या कुवतीप्रमाणे दान करतात, हिंदू धर्मग्रंथात प्रत्येक सणाला कोणते दान करावे याबाबत देखील सांगण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक ऋतूमध्ये देखील दान केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत सांगण्यात आले आहे. उन्हाळ्यातील कडक उन्हात काही विशेष गोष्टी दान केल्यास तुम्हाला त्याचे अनेक पटीनं पुण्य प्राप्त होते.
उन्हाळ्यात करा ‘या’ गोष्टींचे दान
- गूळ
उन्हाळ्यात गुळाचे दान करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार गुळाचे दान केल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होतो. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. समाजात मान-सन्मान मिळतो. शिवाय ज्या गरजू व्यक्तीला आपण दान करतो, त्याचेही शुभार्शीवाद आपल्याला मिळतात.
- पाण्याने भरलेले भांडे
तहानलेल्या व्यक्तीला पाणी दिल्याने आपल्याला पुण्य मिळते. बाकी ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात आपल्याला खूप तहान लागते. घराच्या बाहेरून जाणाऱ्या लोकांना तहान लागल्यास पाणी पिण्यासाठी,अनेक जण त्यांच्या घराच्या बाहेर पिण्याच्या पाण्याचे भांडे भरून ठेवतात, जेणेकरून तहानलेली व्यक्ती ते पाणी पिऊ शकेल.
- सातू
सातूचा संबंध गुरू आणि सूर्य या २ ग्रहांशी संबंधित आहे. गुरू ग्रह धन आणि भाग्यमध्ये वृद्धी करतो, तर सूर्य आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करतो. सातूचे दान केल्याने तुमच्यावर गुरू आणि सूर्य हे दोन्ही ग्रह कृपा करतात. तसेच धर्मशास्त्रानुसार उन्हाळ्यात सातू दान केल्याने व्यक्ती अक्षयपुण्य प्राप्त होते.
- चप्पल
उन्हाळ्यात ऊन खूप असते, त्यामुळे जमीन जास्त प्रमाणात तापलेली असते. अशावेळी एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान केल्यास तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद मिळेल.
हेही वाचा :