Tuesday, April 9, 2024
घरमानिनीReligious'या' राशींच्या व्यक्तींसाठी कासवाची अंगठी आहे Lucky

‘या’ राशींच्या व्यक्तींसाठी कासवाची अंगठी आहे Lucky

Subscribe

वास्तु शास्त्रानुसार कासवाला खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, कासव व्यक्तीच्या जीवनावर शुभ प्रभाव टाकतो. कासवाला श्री विष्णूंचा अवतार मानले जाते. असं म्हणतात घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धीचा वास होतो. तसेच काहीजण धन-वैभव प्राप्त करण्यासाठी हातामध्ये कासवाची अंगठी घालतात.

कासवाची अंगठी घातल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. व्यक्तीची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार कासवाची अंगठी प्रत्येक व्यक्तीच्या राशीसाठी शुभ मानली जात नाही. यामुळे त्या व्यक्तींना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

- Advertisement -

‘या’ राशीच्या व्यक्तींनी घालू नये कासवाची अंगठी

ज्योतिष शास्त्रानुसार, मेष, वृश्चिक, कन्या आणि मीन राशींच्या व्यक्तींनी कधीही हातात कासवाची अंगठी घालू नये नाहीतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या अंगठीमुळे या राशींच्या व्यक्तींना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. सोबतच व्यवसायामध्ये देखील नुकसान भोगावे लागू शकते. या अंगठीमुळे कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये देखील प्रभाव पडतो.

कासवाची अंगठी घालण्याचे फायदे

कासवांची अंगठी: या 4 राशीच्या लोकांनी चुकूनही कासवाची अंगठी घालू नये, गरीब असण्यासोबतच करिअरही नष्ट होईल

- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, मेष, वृश्चिक, कन्या आणि मीन या चार राशी वगळता इतर आठ राशींच्या व्यक्तींना कासवाची अंगठी घातल्याने त्याचे फायदे होतात. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. नकारात्मकता दूर होते. यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होते. ही अंगठी या राशीच्या व्यक्तींसाठी लकी ठरते.

 


हेही वाचा :

पोळ्या कधीही मोजून का करू नये? हे आहे कारण…

- Advertisment -

Manini