Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousNag panchami 2023 : नागपंचमीला नागाचे पूजन का केले जाते? 'हा'...

Nag panchami 2023 : नागपंचमीला नागाचे पूजन का केले जाते? ‘हा’ आहे शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Subscribe

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मात पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्यांची पूजा-आराधना ही केली जाते. या वर्षी नागपंचमीचा सण 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार देखील असणार आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत खास असणार आहे.

नागपंचमीला नागाची पूजा का केली जाते?

- Advertisement -

नागपंचमीचा दिवस कालसर्प योग आणि ग्रहपिडा यापासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, असे म्हणतात की नाग पंचमीला नागाची पूजा केल्याने सर्व दोषातून मुक्ती होते. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी घराच्या दोन्ही बाजूला शेणाने नागाचे चित्र काढले जायचे. यामुळे सर्पदंशाची भिती कमी होते असे समजले जात असे. नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील फायद्याचे मानले जाते. राहु-केतूची पीडा सुरू असल्यास त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस शुभ मानला जातो.

नागपंचमी तिथी

नागपंचमी तिथी 21 ऑगस्ट रात्री 12 : 21 पासून सुरु होणार असून 22 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे नागपंचमी 21 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

नागपंचमी पूजा विधी

  • नागपंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात. त्याचप्रमाणे नागाची पूजा देखील केली जाते.
  • नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावर ठेवावी.
  • नागाची पूजा करण्याआधी शिवपिंडीचे देखील पूजा करावी.
  • त्यानंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून नागाची पूजा करावी.
  • त्यानंतर नागाला कच्चे दूध, तूप, साखर एकत्र करुन त्याचा नैवेद्य दाखवावा.
  • नंतर नाग देवतेची आरती करुन नागपंचमीची कथा वाचावी.

हेही वाचा : Nag panchami 2023 : नागपंचमीला ‘या’ 7 नागांची पूजा का करावी? वाचा पंचमीचे महत्त्व

- Advertisment -

Manini