ज्योतिष शास्त्रामध्ये दिवस, वार, तिथी यांचे खूप महत्त्व आहे. तसेच कोणत्या दिवशी काय करावे काय करु नये हे याचे देखील महत्त्व सांगितले जाते. यात केस कधी कापावे, नखं कधी कापावी कधी कापू नये. यांसारख्या अनेक गोष्टींबाबत महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या जातात. यांचे पालन केल्यास नक्कीच त्याचे फायदे होतात.
नखं कोणत्या दिवशी कापू नये?
- Advertisement -
- ज्योतिष शास्त्रात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी कधीही नखं कापू नये. असं केल्यास या ग्रहांचे अशुभ परिणाम भोगावे लागतात.
- मंगळ ग्रहाच्या अशुभ परिणामाने वैवाहिक आयुष्य खराब होते. तसेच धन-संपत्ती संबंधित समस्या निर्माण होतात.
- गुरुवारी नखं कापल्यास व्यक्तीला दुर्भाग्याचा सामना करावा लागतो.
- शनिवारी नखं कापल्यास शनी ग्रहाचे अशुभ फळं मिळते. यामुळे धनहानी होते.
- शिवाय चतुर्दशी आणि अमावस्येला देखील कधीही नखं आणि केस कापू नये.तसेच सूर्यास्तानंतरही कधीही नखं कापू नये यामुळे व्यक्ती निर्धनी होते.
नखं कधी कापावी?
- ज्योतिष शास्त्रानुसार नखं कापण्यासाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारचा दिवस योग्य मानला जातो. या दिवशी नखं कापल्यास कोणताही त्रास होत नाही.
- नखं कापण्याचा सर्वोत्तम दिवस रविवार सांगण्यात आला आहे. असं केल्याने व्यक्तीला कधीही पैश्यांची कमतरता भासत नाही. त्यामुळे गरीबी दूर होण्यास देखील मदत होते.
- Advertisement -
हेही वाचा :