घरमहाराष्ट्रMaratha Reservation : "तोपर्यंत मी घरी जाणार नाही", मनोज जरांगेंनी स्पष्ट केली...

Maratha Reservation : “तोपर्यंत मी घरी जाणार नाही”, मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्व पक्षांच्या नेत्यांकडून मंजूर करण्यात आला. त्याशिवाय जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, असेही काल मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत आता मनोज जरांगे यांच्याकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

जालना : मराठा आरक्षणासाठी मागच्या 15 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान त्यांच्यात आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठका या सपशेल अपयशी ठरताना पाहायला मिळत आहेत. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. तर सरकारकडूनही यासाठी महिन्याभराचा कालावधी मागण्यात आला आहे. जरांगे यांनी त्यांचे उपोषण कायम ठेवल्याने काल (ता. 11 सप्टेंबर) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच, आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्व पक्षांच्या नेत्यांकडून मंजूर करण्यात आला. त्याशिवाय जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, असेही काल मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत आता मनोज जरांगे यांच्याकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. (Maratha Reservation : “Until then I won’t go home”, Manoj Jarang explained the stance)

हेही वाचा – Manoj Jarange : एक महिन्याची वेळ देतो, पण…; मनोज जरांगेंच्या सरकारसमोर अटी

- Advertisement -

अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारकडून मागणी करण्यात आल्यानंतर जरांगे यांच्याकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आज मराठा समाजाशी संवाद साधताना ते म्हणाले की, समितीचा अहवाल काही येऊ द्या, आम्ही मराठ्यांना आरक्षण देणारच, असे सरकारचे म्हणणं आहे. आमरण उपोषणाच्या जागेवर महिनाभर साखळी उपोषण करा, असंही सरकारने सुचवले आहे. मी बोललो होतो की मी छाताडावर बसून राहणार, तर याचा अर्थ असा झाला. मराठ्यांना आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही तोवर मी घरी जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल की सरकारने जबाबदारी घेतली म्हणून मी घरी जाईन, हे मनातून काढून टाका. मी घरी जाणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, असेही मनोज जरांगे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही तोवर इथून हलणार नाही. महिनाभर लेकरांचे तोंड पाहणार नाही, ज्या दिवशी जातप्रमाणपत्र हातात मिळेल, त्यादिवशी आमरण उपोषण सोडेन. पण ही जबाबदारी तुमच्या जीवावर पार पाडतोय. तुम्ही स्वयंसेवक बना. सर्वांना शिस्त लावा. महिनाभर गावागावांत साखळी उपोषण चालवायचे आहे. दिल्लीचे शेतकरी आठ महिने बसले होते. हटले नाहीत पठ्ठे, मग तुम्हाला एक महिना जमणार नाहीत का?, असा सवाल उपस्थित करत जरांगे यांनी आरक्षणाबाबतची ठाम भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

तर, आजपासून सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. या एक महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सरकारने करावे. आजपासूनच या कामाला सुरुवात करावी. अन्यथा पुढच्या 12 तारखेला म्हणजेच 12 ऑक्टोबरला मराठा समाजाची एक मोठी सभा होईल. या सभेत राज्यातील प्रत्येक मराठा सहभागी होईल. देशाच्या इतिहासात कधी नव्हे अशी ही सभा होईल. मराठ्यांचा आक्रोश या निमित्ताने जगाला पाहायला मिळेल. त्यामुळे सरकारला दिलेल्या एक महिन्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही अपेक्षा असल्याचे मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -