Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousकिचन मधील 'हा' पदार्थ दूर करेल नजरदोष

किचन मधील ‘हा’ पदार्थ दूर करेल नजरदोष

Subscribe

पूजा-पाठ ते ज्योतिष शास्रात सुद्धा किचन मधील काही मसाल्यांचा वापर केला जातो. असे मानले जाते की, किचन मधील मसाले तुमच्या घरात सौभाग्यासह धन योग ही लाभतो. पूजा करणे ते नजरदोष दूर करण्यासाठी किचन मधील काही मसाल्यांचा वापर केला जातो. लोक समृद्धी आणि आनंदाला आकर्षित करण्यासाठी ज्योतिष शास्रातील काही उपायांचा अवलंब करतात. अशातच काही वेळेस असे होते की, एखाद्याची वाईट दृष्ट लागल्यास कामात यश मिळत नाही.

त्यामुळे वाईट दृष्ट लागण्यापासून दूर राहण्यासाठी ज्योतिषातील काही उपाय करू शकतात. त्यापैकी एक म्हणजे लवंगाचा वापर करुन तुम्ही वाईट दृष्ट दूर करू शकता.

- Advertisement -

ज्योतिष शास्रानुसार लवंगाचा वापर एखाद्या पुजेसाठी केला जातो. कारण याचा संबंध शनि आणि बुध ग्रहाशी असतो. याच्या वासाने बुध ग्रह नियंत्रित होण्यास मदत होते. त्याचा काळा रंग शनि दोषांना दूर करतो. एखाद्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आणि घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी पूजेत लवंगाचा वापर केला जातो. जर तुम्ही नियमित रुपात लवंगासह कापूर जाळत असाल तर घरात सकारात्मक उर्जा तयार होते. शनि दोष यामुळे दूर होण्यास मदत होते. यामुळे परिवारातील लोकांना मानसिक शांती सुद्धा मिळते.

- Advertisement -

तसेच कोणत्याही ग्रहाचा वाईट प्रभाव दूर करण्यासाठी लवंग फार उपयोगी आहे. जर तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती कमजोर असेल तर लवंगाचा उपाय करण्याचा सल्ला दिला जातो.

असे मानले जाते की, जर एखाद्याला वाईट दृष्ट लागली असेल तर त्याची कामे बिघडू लागतात. असातच तुम्ही पाच लवंगा घेऊन ज्याला नजर लागली आहे त्याच्या डोक्यावरुन सात वेळा फिरवा आणि एकदा उलट बाजूने फिरवा. त्यानंतर लवंग ही कापूरसोबत जाळा आणि घराबाहेर किंवा अंगणात ठेवा. या उपायाने तुम्ही नजरदोषापासून दूर व्हाल.


हेही वाचा- आर्थिक संकटातून बाहेर काढेल जास्वंदीचे फुल

 

- Advertisment -

Manini