Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligiousPitru Paksha 2023 : पितृपक्षात का केले जाते भरणी श्राद्ध?

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात का केले जाते भरणी श्राद्ध?

Subscribe

हिंदू धर्मामध्ये, श्राद्ध अनुष्ठान करणे महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी घरातील सदस्य आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ति आणि शांती मिळावी यासाठी त्यांची पूजा करू घेतात.

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर रोजी सुरू झाले असून 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.

- Advertisement -

हिंदू धर्मामध्ये, श्राद्ध अनुष्ठान करणे महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी घरातील सदस्य आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ति आणि शांती मिळावी यासाठी त्यांची पूजा करू घेतात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षादरम्यान पितृपक्ष साजरा केला जातो. याच पक्षात भरणी श्राद्धाचे देखील महत्व सांगण्यात आले आहे.

भरणी श्राद्ध का केले जाते?

भरणी श्राद्ध पितृ पक्षातील एक शुभ अनुष्ठान आहे. हे भरणी श्राद्ध व्यक्तिच्या मृत्यूनंतर फक्त एकदाच केले जाते. शास्त्रानुसार, हे श्राद्ध केल्यास मृत व्यक्तिच्या आत्म्याला मुक्ति मिळते. तसेच त्याला अनंत काळापर्यंत शांती प्रदान करते.
हे श्राद्ध विशेषता कुटुंबातील मुख्य पुरूषाच्या हस्ते केले जाते.

- Advertisement -

कधी आहे भरणी श्राद्ध?

यंदा भरणी श्राद्ध 2 ऑक्टोबर रोजी असणार आहे.


हेही वाचा :

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षामध्ये जन्मलेल्या मुलांवर असतो पितरांचा आशीर्वाद

- Advertisment -

Manini