Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligiousPitru Paksha 2023 : पितृपक्षात कधीही करु नये 'या' गोष्टी

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कधीही करु नये ‘या’ गोष्टी

Subscribe

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर रोजी सुरू झाले असून 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. मात्र, याव्यतिरिक्त पितृपक्षामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या वर्ज्य मानल्या जातात.

- Advertisement -

पितृपक्षात करू नये ‘या’ गोष्टी

  • पितृपक्षात घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये.
  • पितृपक्षात कांदा आणि लसूण खाऊ नये.
  • पितृपक्षात कधीही मासांहार करू नये.
  • पितृपक्षाच्या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये.
  • पितृपक्षात नवीन घर, कपडे, वाहन, दागिने खरेदी करू नका.
  • पितृपक्षात केस, नखं, दाढी कापू नका.

हेही वाचा :

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात का केले जाते भरणी श्राद्ध?

- Advertisment -

Manini