घरदेश-विदेशBJP खासदाराने महिला खासदाराचा आधी हात पकडला नंतर असे केले की...; व्हिडीओ...

BJP खासदाराने महिला खासदाराचा आधी हात पकडला नंतर असे केले की…; व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, भाजपचे खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा कोल भागात आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

अलीगड : कार्यक्रम चालू होता. यावेळी व्यासपीठावर भाजपच्या अलिगड विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता राजा याही बसल्या होत्या. यावेळी भाजपचे अलिगडचे खासदार सतीश गौतम बसले होते. भाजप खासदार सतीश गौतम यांनी यावेळी मात्र महिला आमदार मुक्ता राजा यांच्या हातावर आधी हात ठेवला. त्यानंतर महिला आमदाराने विरोध केला. यानंतर खासदार आणखी पुढे गेले. खासदार सतीश गौतम यांनी दोन्ही हातांनी महिला आमदाराचे खांदे दाबले आणि हसू लागले. ही संपूर्ण घटना कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (The BJP MP first grabbed the woman MPs hand and then said… The video is going viral)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, भाजपचे खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा कोल भागात आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजप खासदार सतीश गौतम आणि आमदार मुक्ता राजा हे एकमेकांच्या शेजारीच बसलेले होते. त्यावेळी सतीश गौतम यांनी मुक्ता राजा यांचा आणि हात पकडला मग, खांदा दाबल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना उपस्थितांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून आता राजकारण पेटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘त्याने’ साईबाबा आणि भक्तालाही नाही सोडले; देणगीत ‘झोल’ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

महिला आमदाराने केला विरोध

खासदार सतीश गौतम आणि अलिगड शहराच्या आमदार मुक्ता राजा हे दोन्ही नेते कोल परिसरात भाजपच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. हे दोन्ही नेते मंचावर बसले असताना खासदाराने गौतम यांनी आमदार राजा यांच्या हातावर हात ठेवला. आमदारांनी लगेच विरोध केला. खुर्चीवर बसलेल्या खासदाराने त्यांचे दोन्ही खांदे दाबले. यानंतर ते हसू लागले. या घटनेनंतर संतप्त आमदाराने खुर्ची बदलली. व्हायरल झालेला व्हिडिओ दोन दिवस जुना असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Pune Crime : रुग्णालयात बसून तो चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; मात्र Crime Branch ने उधळला डाव

भाजप नेत्याच्या पत्नी आहेत मुक्ता राजा

अलिगड विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता राजा या माजी आमदार आणि ज्येष्ठ भाजप नेते संजीव राजा यांच्या पत्नी आहेत. वाहतूक पोलिसांसोबत मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरल्याने संजीव राजा यांना निवडणुकीचे मैदान सोडावे लागले होते. त्यांनी पत्नी मुक्ता राजा यांना विधानसभा निवडणुकीत उभे केले. त्यामध्ये त्या विजयी झाल्या. यावर्षी 11 फेब्रुवारी रोजी संजीव राजा यांचे निधन झाले. ते आजारी होते. त्यांच्या निधनाने अलीगढमध्ये शोककळा पसरली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -