Thursday, April 18, 2024
घरमानिनीReligiousकुटुंबात पितृदोष असल्याची 'ही' आहेत लक्षणं

कुटुंबात पितृदोष असल्याची ‘ही’ आहेत लक्षणं

Subscribe

कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींना (पूर्वजांना) पितर म्हटलं जातं. हिंदू धर्मात पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा करतात. मात्र, तरीही अनेकदा काही व्यक्ती पितृदोषाचा सामना करावा लागतो. आपले पितर जर आपल्यावर नाराज असतील तर त्याचा वाईट परिणाम अनेक मार्गांनी आपल्याला भोगावा लागतो.

 पितर तुमच्यावर नाराज असल्याची लक्षणं

  • प्रत्येक कामात अडथळा

If job stress is killing you, it's time to leave
पितर तुमच्यावर नाराज असल्यास तुमच्या सर्व कामांमध्ये सतत अडथळे निर्माण होतात. कितीही मेहनत केली तरीही कामात हवे तसे यश मिळत नाही.

- Advertisement -
  • कुटुंबात सतत कलह

3 Signs Your Family Fighting is Out of Control – Courtney Clark
पितर नाराज असल्यावर कुटुंबात सतत कलह निर्माण होते. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांचा मत्सर करु लागतात.

  • विवाहात अडथळे

Arranged Marriage – Good or Bad?
पितर नाराज असल्यावर कुटुंबातील मुलगा किंवा मुलीच्या लग्नामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. तसेच वैवाहिक जीवनातही अनेक वाद निर्माण होतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच पितरांच्या नाराजीमुळे मुलं होण्यास अडथळे येतात.

- Advertisement -
  • आजारपण

Spotlight on Women's Healthपितर नाराज असल्यास कुटुंबात सतत आजारपण राहते.

पितृदोषासाठी उपाय

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षात आपल्या पितरांचे तर्पण आणि श्राद्ध श्रद्धेने करावे. फक्त पितृपक्षच नाही तर कोणत्याही महिन्यातील अमावस्या, पौर्णिमा, त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथींना घराच्या दक्षिणेकडे तोंड करुन दिवा लावा. त्याचबरोबर दररोज सकाळी उठल्याबरोबर दक्षिणेकडे तोंड करुन पितरांना वंदन करा. पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.


हेही वाचा :

रात्री झोपताना उशीखाली ‘या’ वस्तू ठेवल्यास होईल लाभ

- Advertisment -

Manini