Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousPitru Paksha 2023 : पितृदोष असेल तर मुक्तिसाठी करा ‘हे’ उपाय

Pitru Paksha 2023 : पितृदोष असेल तर मुक्तिसाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर रोजी सुरू झाले असून 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष असते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पितर धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.

- Advertisement -

पितृदोषापासून मुक्तिसाठी करा ‘हे’ उपाय

  • ज्योतिष शास्त्रामध्ये पितृदोषाला खूप अशुभ मानले जाते. अनेकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना विणाकारण अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
  • पितृपक्षात पितृदोषापासून मुक्तिसाठी तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता.
  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ, सफेद चंदन, सफेद फूल टाकून पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. त्यानंतर शुद्धा तूपाने दिवा लावत ‘ॐ सर्व पितृ देवाय नम:’ या मंत्राचा जप करा. यामुळे नक्कीच पितृदोषापासून मुक्ति मिळेल.
  • पितृपक्षात घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून पितृ सुक्ताचे पठण करा.

पितृ पक्षामध्ये करू नका ‘या’ गोष्टी

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षामध्ये पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. या काळात घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. म्हणजेच गृह प्रवेश, हवन, लग्न, साखरपुडा तसेच नवीन वस्तू देखील या काळात खरेदी करू नये.


हेही वाचा : Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कधीही करु नये ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini