घरठाणेठाणे जिल्ह्यात कुपोषणाचा विळखा घट्ट; ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी समोर

ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचा विळखा घट्ट; ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी समोर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 109 बालके तीव्र कुपोषित, तर एक हजार 241 बालके मध्यम कुपोषित असल्याचे महाराष्ट्र सरकारच्याच सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 109 बालके तीव्र कुपोषित, तर एक हजार 241 बालके मध्यम कुपोषित असल्याचे महाराष्ट्र सरकारच्याच सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्याचा महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाने ठाण्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केले आहे. गेली अनेक वर्षे असलेलं हे कुपोषण कमी करण्यात आजही प्रशासनाला यश आलेलं नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषित 47 बालकं डोळखांब परिसरात आहेत. (Malnutrition is tight in Thane district Statistics for the month of August)

ठाणे जिल्ह्यात शहापूर, डोळखांब, मुरबाड, मुरबाड-2, भिवंडी 1, भिवंडी 2, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये एकूण एक हजार 646 अंगणवाड्या कार्यरत आहेत. सर्वेक्षणामध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकूण 86 हजार 453 बालकांची नोंद आहे. यापैकी 83 हजार 754 बालकांचं वजन घेण्यात आलं होतं. ऑगस्टमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार, यामधील 109 बालकं तीव्र कुपोषित, तर एक हाजर 241 बालकं मध्यम कुपोषित असल्याचं आढळून आलं. गेल्या चार ते पाच महिन्यांतील आकडेवारी पाहता, कुपोषित बालकांची संख्या काही अंशी कमी झाली असली, तरी तीव्रता मात्र कायम आहे.

- Advertisement -

126 बालकं दुर्धर आजाराने त्रस्त

ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 126 बालकांना विविध दुर्धर आजारांनी ग्रासले असल्याचं जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीनं केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. जिल्ह्यातील भिवंडी 1, मुरबाड 2, डोळखांब, शहापूरमध्ये सर्वाधिक बालकं दुर्धर आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये जन्मता: व्यंग, शारीरिक दोष, श्रवणदोष, नेत्रदोष, कान ,नाक, घसा, ह्रदयरोग, कर्करोग, शारीरिक दुर्बलता, बालपणीचे आजार यांसारखे दुर्धर आजार आढळून आले आहेत.

मार्च महिन्यातील स्थिती

त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 16 प्रकल्प आहेत. त्यापैकी शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी आठ प्रकल्प आहेत. यानुसार मार्च 2023 च्या मासिक प्रगती अहवालानुसार जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 049 बालकांचे वजन करण्यात आले. यामध्ये 2 लाख 43 हजार 009 बालके सामान्य वजनाची, 20 हजार 361 मध्यम व कमी वजनाची आणि 2 हजार 679 अत्यंत कमी वजनाची बालके आढळून आली. म्हणजेच कमी वजनाच्या मुलांची संख्या 23 हजार 034 वर पोहोचली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली होती.

- Advertisement -

(हेही वाचा:  Eknath Shinde: “मराठवाडा मुक्ती संग्राम” इतिहासातील न विसरता येणारे पर्व – मुख्यमंत्री )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -