Thursday, December 7, 2023
घरमानिनीReligiousPitru Paksha 2023 : पितृ पक्षामध्ये जन्मलेल्या मुलांवर असतो पितरांचा आशीर्वाद

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षामध्ये जन्मलेल्या मुलांवर असतो पितरांचा आशीर्वाद

Subscribe

पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते.

हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांच्या काळात पितृ पंधरावडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तिंचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपक्षावला विशेष महत्व आहे. यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

असं म्हणतात की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज धरतीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ति मिळावी म्हणून हा काळ खूप महत्वपूर्ण मानला जातो. तसेच पूर्वजांचे श्राद्ध केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. मात्र, या 15 दिवसांच्या कामात घरामध्ये कोणतही शुभ कार्य केले जात नाही. परंतु जर पितृ पक्षाच्या काळात घरामध्ये मुल जन्माला आलं. तर अशा मुलांचे भाग्य कसे असते. असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

- Advertisement -

पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांचे कसे असते भाग्य

Fascinating Newborn Facts | Baby Facts | New Arrival | Kendamil

 • पितरांचा असतो खास आर्शिवाद
  शास्त्रानुसार, पितृ पक्षामध्ये जन्माला आलेल्या मुलांना अत्यंत सौभाग्यशाली मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार, या 15 दिवसात जन्म घेणाऱ्या मुलांवर पितरांची विशेष कृपा असते. अशी मुलं आयुष्यात पुढे जाऊन प्रत्येक परिक्षेमध्ये यशस्वी होतात.
 • मृत पूर्वज पुन्हा घेतात जन्म
  असं म्हणतात की, पितृ पक्षामध्ये जन्मलेली मुलं कुटुंबातील मृत पूर्वज आहेत. जे काही खास कारणाने पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये जन्म घेतात. असं म्हटलं जात की, श्राद्धाच्या दरम्यान जन्मलेली मुलं खूप रचनात्मक असतात आणि ते पुढे जाऊन कुटुंबाच नाव खूप मोठं करतात.
 • इतरांच्या तुलनेत खूप समजूतदार असतात
  पितृ पक्षातील जन्मलेली मुलं इतरांच्या तुलनेत खूप समजूतदार असतात. वयाच्या तुलनेत लवकर सर्व गोष्टी आत्मसात करतात.
 • कुटुंबावर खूप प्रेम असते
  ज्योतिष शास्त्राच्या मते, पितृ पक्षामध्ये जन्म घेणारी मुलांना आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असते. ते आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असतात.

हेही वाचा :

Pitru Paksha 2023 : पितृपक्षामध्ये कावळ्यांनाच का दिले जाते जेवणाचे पान?

- Advertisment -

Manini