Friday, September 29, 2023
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला 700 वर्षानंतर पंच महायोग; राखी बांधताना करु नका 'या' चूका

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला 700 वर्षानंतर पंच महायोग; राखी बांधताना करु नका ‘या’ चूका

Subscribe

यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी साजरे केले जात असून 30 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे पाच ग्रह मिळून पंच महायोग निर्माण करत आहेत. या 5 ग्रहांमुळे बुधादित्य, वसरापती आणि षष्ठ योग देखील निर्माण होत आहेत. असा योग जवळपास 700 वर्षानंतर निर्माण झाला आहे. मात्र, या दिवशी भद्रा काळ देखील आहे. जो शास्त्रात अशुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी काही चुका करण्यापूर्वी सावध राहावं.

रक्षाबंधनाच्या दिवशी करु नका ‘या’ चूका

  • यंदा रक्षाबंधन 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट हे दोन्ही साजरे होत असले तरी या दिवशी भावाला भद्रा काळात राखी बांधू नये. शास्त्रात ही वेळ अशुभ मानले जाते.
  • रक्षाबंधनाच्या दिवशी सात्विक, शुद्ध आहाराचे सेवन करावे.
  • बहिणीने भावाला राखी बांधण्यापूर्वी देवाकडे त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी.
  • भावाला राखी बांधताना त्याचा चेहरा कधीही पश्चिम-दक्षिणेला करु नये. राखी बांधताना भावाचा चेहरा नेहमी पूर्व किंवा उत्तरेला करावा.
  • भावाला काळ्या किंवा निळ्या रंगाची राखी बांधू नये.
  • रक्षाबंधन साजरे करताना भावाने आणि बहिणीने काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करु नये.
  • भावाने बहिणीला गिफ्ट वस्तू देताना देखील विशेष काळजी घ्यावी. बहिणीला कधीही चप्पल, बूट काचेच्या वस्तू, धारदार वस्तू भेट देऊ नये.

कधी आहे भद्रा काळ?

- Advertisement -

30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:59 पासून श्रावण शुक्ल पौर्णिमा सुरू होईल. श्रावण पौर्णिमेसोबतच भद्रा काळ देखील सुरु होईल. जो 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 वाजता समाप्त होईल. त्यानंतर शुभ मुहूर्त सुरू होईल.

त्यामुळे 30 ऑगस्ट 2023 रोजी राखी बांधायची असेल तर रात्री 9.15 नंतरच बांधावी. तसेच तुम्ही 31 ऑगस्टला देखील रक्षाबंधन साजरी करु शकता. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.


हेही वाचा :

Raksha Bandhan 2023 : भद्रा काळ म्हणजे काय? ‘या’ काळात राखी का बांधू नये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini