श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यावर्षी आज म्हणजेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधन साजरा केला जाईल. परंतु तुम्ही ऐकलं असेल की, रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं. शिवाय हा भद्रा काळ आज (30 ऑगस्ट) रात्री 9 पर्यंत असेल त्यामुळे अनेकांना राखी बांधण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागेल.
मात्र, याच भद्रा काळात एक वेळ अशी देखील आहे ज्यावेळी भद्राचा प्रभाव थोडा कमी असतो. ज्याला ज्योतिष शास्त्रामध्ये भद्रा पुच्छ म्हणतात. ज्यांना रात्री 9 पर्यंत वाट पाहणं शक्य नाही त्यांनी त्या ठाराविक वेळेत राखी बांधावी.
पुच्छ भद्रा किती वाजता आहे?
ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑगस्ट रोजी भद्रा पुच्छ संध्याकाळी 5.19 पासून सुरू होईल आणि 6.31 वाजता समाप्त होईल. जर तुम्ही आजच रक्षाबंधन साजरे करत असाल आणि तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी रात्री 9 वाजेपर्यंत थांबू शकत नसाल, तर विशेष स्थितीत भद्रा पुच्छ काळात तुमच्या भावाला राखी बांधू शकता.
राखी बांधताना करा ‘या’ मंत्राचा जप
येन बधो बळी राजा, दानवेंद्रो महाबलाह
तेन त्वं रक्षा बधनामी, रक्षे मचल मचल:।
- Advertisement -
हेही वाचा :
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन दिनी ‘या’ तीन कथा वाचायलाच हव्यात
- Advertisement -
- Advertisement -