घरठाणेShrikant Shinde : पत्राचाळीचे आरोपीच पत्र लिहू लागलेयत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना...

Shrikant Shinde : पत्राचाळीचे आरोपीच पत्र लिहू लागलेयत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्राचाळीचे आरोपीच आता पत्र लिहू लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर हसायचे की रडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आता पत्राचाळीचे आरोपीच पत्र लिहू लागले आहेत, तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर त्यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. (Shrikant Shinde response to Sanjay Raut scam allegation)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांनी लिहिलेले पत्र मी वाचलेले नाही, पण त्या पत्रामध्ये वैद्यकीय सेवेबाबत माहिती लिहिण्यात आली आहे. कोणाकोणाला मदत केली जाते, त्याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी स्वतःकडे ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून कोणी शिव्या शापांऐवजी कोणती गोष्ट येत नाही, पण आता त्यांनी फाउंडेशन जे चांगले काम करत आहे, त्याची माहिती पत्रात लिहिली आहे. त्यासाठी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयातून 500 कोटी गोळा केले, संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेवर आरोप

त्याचबरोबर, संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे, ज्यामुळे पंतप्रधानांवर त्यांचा विश्वास वाढला आहे. पण हे आरोप कोणाकडून करण्यात आले आहेत. हे पत्र कोणी लिहिले आहे, याचा प्रसार माध्यमांनी विचार करावा आणि याची किती दखल घेतली पाहिजे हे ठरवले पाहिजे. जे लोक पत्राचाळीचे आरोपी आहेत, जे लोक जेलमध्ये जाऊन आले आहेतस तेच लोक पत्र लिहित आहेत, हे देखील पाहावे, असा हल्लाबोल श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, जे खिचडी घोटाळ्याचे आरोपी आहेत. ज्यांच्या कुटुंबातील लोकांच्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे आले. त्या घोटाळ्याच्या पैशातून त्यांनी किती लोकांना मदत करण्यात आली. किती विद्यार्थ्यांना मदत झाली, किती रुग्णांना त्या पैशांमधून मदत करण्यात आली, याचा तपशील त्यांनी दिला पाहिजे, त्यामुळे पत्राच्या घरात राहणारे दुसऱ्यांना पत्र नाही लिहित, असाही टोला श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना लगावला आहे. पण राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : श्रीकांत शिंदे फाऊंडेशच्या घोटाळ्याची चौकशी करा, राऊतांची मागणी


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -