घरमहाराष्ट्रनाशिकSushma Andhare On Narwekar : "शकुनीसारखे लोक कूटनीतीने फासे टाकतात...", सुषमा अंधारेंची...

Sushma Andhare On Narwekar : “शकुनीसारखे लोक कूटनीतीने फासे टाकतात…”, सुषमा अंधारेंची राहुल नार्वेकरांवर टीका

Subscribe

जेव्हा महाभारतात कुरुक्षेत्रात युद्ध सुरू झाले. तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा विजय झाला होता. त्यामुळे विजय हा आमचा होणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : ठाकरे गटाचे आज नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ‘शकुनी मामा’ची उपमा दिली आहे. ‘शकुनीसारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीने फासे टाकतात, तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता. जेव्हा महाभारतात कुरुक्षेत्र युद्ध सुरू झाले. तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा विजय झाला होता”, अशी टीका सुषमा अंधारेंनी राहुल नार्वेकर यांच्यावर केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेरकरांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर सुषमा अधारे म्हणाल्या, “आपल्या भारतात रामायण आणि महाभारत अशी दोन महाकाव्य झाली आहेत. या दोन्ही महाकाव्याने आम्हाला दोन गोष्टी शिकवल्या आहेत. रामायणाने शिकविले की, हरिण कधीच सोन्याचे नसते. मृगजळाच्या मागे धावू नये. आम्हाला भाजपाच्या मृघजळाच्या मागे धावायला सांगितले जाते. त्याला काही अर्थ नाही कारण त्या वस्तूस्थिती आणि वास्तव काहीच नाही. फक्त प्रचार, जाहीराती आणि मार्केटिंग केले जाते. महाभारतात आम्हाला अजून एक गोष्टी शिकविली गेली की, जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असेल, तर सुटाचे राजकारण सुरू होते. महाभारतात कौरवांकडे बहुमत होते. सत्ता असत्याच्या बाजूने होती. पण सत्ता असत्याच्या बाजून जोपर्यंत होती आणि शकुणीसारखे पाताळयंत्री लोक कुटनीतीने षडयंत्र करत फासे टाकत होती. तोपर्यत कौरवांचा विजय होत होता. राहुल नार्वेकरांसारखे पाताळयंत्री लोक जोपर्यंत कपट नितीने फासे टाकतात. तोपर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल, त्या सर्वांना वाटत असेल की, फासे आमच्या बाजून पडतील. जेव्हा महाभारतात कुरुक्षेत्रात युद्ध सुरू झाले. तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा विजय झाला होता. त्यामुळे विजय हा आमचा होणार आहे, असा विश्यावस सुषमा अंधारेंनी अधिवेशनात व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Supriya Sule : रोहित पवारांना आजोबा, आत्याची साथ; सुळे म्हणाल्या- लढेंगे और जितेंगे!

सुषमा अंधारेंची पंतप्रधानांवर टीका

प्रभू श्रीराम हे एकवचनी होती. तुम्ही 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलेल्या अजित पवारांसोबत घेता, ही कसली एकवचनी असा, सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर राष्ट्रवादीशी युती कधीच नाही असे म्हणतात. पण पहाटे आणि दुपारी दोन वेळा पळून जाऊन लव्हमॅरेज करतात, असा टोलाही सुषमा अंधारेंनी केला. शिंदे गटावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, एवढा विषय घेतो आणि संपवतो. तुमच्या परवानगीने सांगते विषय सुरू झाला आहे. हा विषय तेव्हा संपेल, जेव्हा एका एका गद्दाराला त्यांची जागा दाखवून देऊ आणि चाळीस गद्दारांना पाडू.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -