Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसा आघवाचि परी पांडवा । जींहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मींचि केला ॥
हे पांडवा, अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर ठेवून आपल्या जीविताचा आधार मलाच केले.
ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां । परि मजसीं तुकितां तुकां । तुटी नाहीं ॥
ते पापयोनीत जन्म घेतलेले असोत किंवा शास्त्रदेखील ऐकलेले किंवा वाचलेले नसोत, पण त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते मजपेक्षा कमी नाहीत.
पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें । माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमे ॥
हे पाहा की, भक्तीच्या महत्त्वाने दैत्यांनी देवांनाही मागे टाकले व त्या प्रल्हादाच्या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला.
तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें संकटें सदा किरीटी । कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥
हे किरीटी, ज्या प्रल्हादाने माझ्या प्राप्तीकरिता नेहमी अनंत संकटे सहन केली, त्या प्रल्हादाचे चरित्र जर वर्णन केले, तर माझ्या प्रसन्नतेपासून जी प्राप्ती होते, तीच त्या चरित्रवर्णनापासून होते.
एर्‍हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें । म्हणौनि भक्ती गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥
बाकी वास्तविक पाहता त्याने दैत्यकुळात जन्म घेतलेला, पण त्याच्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही; म्हणून माझी प्राप्ती करून घेण्याला एक भक्तीच पुरे आहे; जात वगैरेची काही एक अडचण नाही.
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती । तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तू ॥
राजाज्ञेची अक्षरे एका कातड्याच्या तुकड्यावर जरी पडली, तरी त्या कातड्यापासून सर्व वस्तू प्राप्त होतात.

- Advertisment -

Manini