Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : 'हे' अनोखं झाडं घरामध्ये लावताच व्हाल मालामाल

Vastu Tips : ‘हे’ अनोखं झाडं घरामध्ये लावताच व्हाल मालामाल

Subscribe

शास्त्रात अशी काही झाडं आहेत, जी धार्मिक दृष्टीकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत. यामधील काही झाडं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत.

वास्तू शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात काही गोष्टींना खूप चमत्कारी आणि पवित्र सांगण्यात आले आहे. ज्यामुळे आयुष्यातील अनेक समस्याचे समाधान होऊ शकते. शास्त्रात अशी काही झाडं आहेत, जी धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत. यामधील काही झाडं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत, असंच एक झाड आहे, ते म्हणजे मयूर शिखा म्हणून ओळखलं जातं.

बहुत चमत्कारी है मयूर शिखा का पौधा, जानें इसे घर में लगाने के लाभ

- Advertisement -

हे झाड तुम्हाला सहज कुठेही मिळू शकते. हे मोराच्या पंखांसारखे दिसते. या झाडाला अनेक भाषेत वेगवेगळी नावं आहेत. बंगाली भाषेत या झाडाला लाल मोगर किंवा मोरगफूल असं म्हणतात, तेलुगू भाषेत मायरक्षिपा असं म्हणतात, तर इंग्रजी भाषेत पीकॉक्स टेल प्लांट असं म्हणतात. खरंतर हे झाड कोंबड्याच्या तुऱ्यासारखे दिसते. परंतु हे वास्तु शास्त्रानुसार घरात ठेवणे अत्यंत शुभ आहे. यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होतो आणि धनप्राप्ती होते.

मयूर शिखेचे फायदे

- Advertisement -
  •  मयूर शिखेचं झाड घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर करते, या झाडामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होतो. तसेच या झाडाने घरामध्ये सुख-समृद्धी येते.
  •  मयूर शिखेचं झाड घरात लावल्याने पितृदोषाचे निवारण होते. ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे, त्यांनी हे झाड घरामध्ये जरूर लावावे.
  •  मयूर शिखेचं झाड घरात लावल्याने घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही.
  • मयूर शिखेचं झाड घरात लावल्याने मानसिक तणावापासून सुटका मिळते. खरं तर या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे तुम्हाला होणारा मानसिक त्रास कमी होतो.
  •  मयूर शिखेचं झाड आयुर्वेदिकसुद्धा आहे. कफ, पित्त, मधुमेह यांसह अनेक आजारांवर मयूर शिखेचं झाड रामबाण ठरते.


हेही वाचा :

Vastu Tips : घरातील कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा?

- Advertisment -

Manini