घरलाईफस्टाईलजळालेल्या कुकरला 'असे' करा स्वच्छ...

जळालेल्या कुकरला ‘असे’ करा स्वच्छ…

Subscribe

किचनमध्ये स्वंयपाक करत असताना अनेकदा आपण इतर कामांमध्ये गुंतून जातो आणि मग कधी भात करपतो तर कधी भाजी. कधी दूध उतू जातं तर कधी तेल जास्त तापतं. अशावेळी आपली अनेक भांडी ही अगदी काळी होतात. त्यांच्यावर कार्बनचा थर जमा होतो. आणि यामुळे कुकर भांडी संपूर्ण काळाकुट्ट होऊन जातो. अशावेळी यावर जास्त मेहनत न घेता यावर नैसर्गिक गोष्टींचा वापर करून यावरचा काळेपणा अगदी साफ करता येतो.

याशिवाय किचनमधीलच सहज उपलब्ध होणाऱ्या इतर काही सामुग्रीच्या मदतनेही काळी झालेली भांडी चमकवणं सहज शक्य आहे. अनेकदा तारेचा बोळा वापरून ती भांडी स्वच्छ होत नसतील तर काही घरगुती ट्रीक्स वापरून तुम्ही ती पुन्हा एकदा चमकवू शकता. तसेच आता आपण जाणून घेऊया जळालेल्या कुकरला कसे स्वच्छ करता येईल.

- Advertisement -

How to Clean a Stained Pressure Cooker || Cleaning A Stained Pressure Cooker - YouTubeकांदा आणि विनेगर

स्वयंपाक घरातील कुकर जर खुपच काळा झाला असेल तर कांदा आणि विनेगरचा एकत्र वापर करा. यासाठी अर्धी वाटी व्हाईट विनेगरमध्ये कांद्याचा रस मिसळा. आता हे मिश्रण करपलेल्या कुकरवर सर्व बाजुंनी नीट पसरवून लावा. त्यानंतर जवळपास १५ मिनिटं हे मिश्रण कुकरवर वाळू द्या त्यानंतर ब्रशने भांड घासून पाण्याने धुवा. यामुळे तुमचा कुकर एकदम स्वच्छ होईल.

कांदा आणि बेकिंग पावडर

कुकर जर का जास्त काळा पडला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कांदा आणि बेकिंग पावडरचाही वापरू शकता. यासाठी करपलेल्या कुकरवर एक छोटा चमचा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा पसरवून घ्या आणि आता स्क्रबने कुकर व्यवस्थित घासून घ्या.

- Advertisement -

मिठाच्या पाण्याने करा कुकर स्वच्छ

जेव्हा कुकर खराब होतो म्हणजेच जेव्हा तो जळतो अशावेळी कुकर मिठाच्या गरम पाण्यात भिजत ठेवा. यामुळे कुकरचे काळे डाग जरा कमी होतील. कारपलेला कुकरचे चिकट डाग यामुळे कमी होतील. आणि मग जेव्हा तुम्ही त्यावर साबण लावाल तेव्हा कुकर सहजपणे धुतला जाईल. तसेच कुकरचे चिवट डाग जास्तकाळ यावर राहणार नाहीत.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये असलेल्या सट्रिक ऍसिडमुळे काळा झालेला कुकर लगेच स्वच्छ होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही लिंबाचा रस या कुकरवर घासाला तेव्हा यावर गरम पाणी हळुवारपणे सोडा यामुळे पटकन कुकर स्वच्छ होईल. यावरचे काळे डाग सहज निघून जातील. आणि कुकर छान चमकेल. अनेकदा अल्युमिनियमचा कुकर आतून काळा होतो. अशा वेळी तुम्ही कुकरमध्ये डब्ब्याचा वापर करून डाळ किंवा भात शिवत असताना कुकरमध्ये टाकलेल्या पाण्यात वापरलेलं अर्ध लिंबू तुम्ही टाकू शकता. यामुळे कुकर आतून काळं होणार नाही आणि स्वच्छ राहिलं.


हेही वाचा :  उंदरांना घरातून पळवण्यासाठी घरगुती उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -