Corona Live Update: औरंगाबादमध्ये बाधितांचा आकडा ११ हजार पार

Corona Live Update: औरंगाबादमध्ये बाधितांचा आकडा ११ हजार पार

लाईव्ह अपडेट

Corona: औरंगाबादमध्ये ४३८ नव्या रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून औरंगाबाद जिल्ह्यात आज ४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार २४१ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात ४ हजार ५४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर २५, मोबाईल स्वॅब कलेख्स पथकास १३९ आणि ग्रामीण भागात ८९, जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या तपासणीत १० रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (सविस्तर वाचा)

पुण्याचा धोका वाढतोय

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पुण्यात २४ तासांत २ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ हजार १३ वर पोहोचला आहे. तर यापैकी १ हजार ३८७ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. (सविस्तर वाचा)

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ४२७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)
सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची बातमी समोर येत आहे. आज सकाळी त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती, त्यानंतर संध्याकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

राज्यात २४ तासांत ८,२४० नवे रूग्ण; १७६ जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार २४० नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १७६ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख १८ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ४६० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार २९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.९२ % एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ४२७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)

देशात आतापर्यंत १ कोटी ४० लाखाहून अधिक जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. तर रविवारपर्यंत २ लाख ५० हजार रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. तर देशात सुमारे ७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्रात १.६० लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

#Coronawatch India

?आतापर्यंत 1.40 कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी ?काल 19 जुलै रोजी 2.50 लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी ?देशात सुमारे 7 लाख रुग्ण बरे झाले ?महाराष्ट्रात 1.60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले#IndiaFightsCorona @MoHFW_INDIA pic.twitter.com/38lRMV1FpW — PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) July 20, 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांच्या कुटुंबातील १८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशात काल दिवसभरात ४० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी नव्या ३६ रूग्णांची नोंद करण्यात आली. त्याचबरोबर अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत १३७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०,८०३ वर पोहचली आहे. सविस्तर वाचा 
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली. सविस्तर वाचा 
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ४६ लाख ४० हजार ३७५ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख ८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८७ लाख ३४ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शनिवारी राज्यात ९५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील हा नवा उच्चांक ठरला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३,१०,४५५ झाली आहे. राज्यात १,२८,७३० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रविवारी २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११ हजार ८५४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.८२ टक्के एवढा आहे. वाचा सविस्तर  
First Published on: July 21, 2020 12:16 PM
Exit mobile version