Corona: औरंगाबादमध्ये ४३८ नव्या रुग्णांची नोंद, आकडा ११ हजार पार

औरंगाबाद जिल्ह्यात आज ४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार २४१ वर पोहोचला आहे.

covid 19
कोरोना

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून औरंगाबाद जिल्ह्यात आज ४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार २४१ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ३०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात ४ हजार ५४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर २५, मोबाईल स्वॅब कलेख्स पथकास १३९ आणि ग्रामीण भागात ८९, जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या तपासणीत १० रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

४ जणांचा मृत्यू

आज घाटीमध्ये ३ कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगोपाल नगर मधील ४८ वर्षीय पुरुष, एन ७ सिडको मधील ५२ वर्षीय पुरुष, बकापूर, पळशी येथील ४५ वर्षीय स्त्री आणि शहरातील एका खासगी रुग्णालयात सिटी चौकातील ७४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात २४ तासांत ८,२४० नवे रूग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार २४० नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १७६ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख १८ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ४६० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार २९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.९२ % एवढे झाले आहे.


हेही वाचा – Mumbai Coronavirus Daily Update: आज कोरोनाचे १ हजार नवे रुग्ण, तर ४१ जणांचा मृत्यू