Corona Update: देशात २४ तासांत आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ

corona virus in india

भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात काल दिवसभरात ४० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या विक्रमी वाढीनंतर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.