हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. यंदा 6 मार्च 2023 रोजी होलिका दहन केले जाईल आणि 7 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल.ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी काही चांदीशी संबंधित 3 वस्तू खरेदी करून घरी आणल्यास कुटुंबात सुख-समृद्धीचे आगमन होते. यासोबतच अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.
होळीच्या दिवशी खरेदी करा चांदीच्या 3 वस्तू
- चांदीचे नाणे
होळीच्या दिवशी कुटुंबातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिका चांदीचे नाणे खरेदी करा. त्यानंतर ते पिवळ्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ठेवा. या उपायाने घरात संपत्तीची कमतरता भासणार नाही. कुटुंबात समृद्धी वाढेल.
- चांदीची अंगठी
होलिका दहनाच्या दिवशी चांदीची अंगठी खरेदी करा. यामुळे देखील तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. ही अंगठी परिधान करण्यापूर्वी त्याची नीट पूजा करावी. असे म्हटले जाते की अशा प्रकारे अंगठी घातल्याने कुटुंबात समृद्धी येते आणि प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहते.
- चांदीची भांडी
होळीच्या दिवशी विवाहित महिलांनी चांदीची भांडी खरेदी करावी. यामध्ये तुम्ही चांदीचा दीवा, चांदीची वाटी, ताट या वस्तू खरेदी करु शकता. होलिका दहनाच्या दिवशी ती खरेदी करून घरी आणल्यानंतर त्यांना प्रथम दुधाने स्नान घालावे.
हेही वाचा :