घररायगडआमदार महेंद्र थोरवेंची बहिणीने सोडली साथ;राष्ट्रवादीत प्रवेश

आमदार महेंद्र थोरवेंची बहिणीने सोडली साथ;राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

माझे अस्तित्व संपविण्याचे कटकारस्थान सुरू होते.कठीण काळ असताना सुध्दा मी प्रामाणिक कार्यकर्ती म्हणून सर्व दुःख विसरून काम करत होते. मी माझं अस्तित्व टिकविण्यासाठी (शिंदे गट) शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असल्याचे सुरेखा खेडकर यांनी सांगितले.

खोपोली-:
कर्जत खालापूरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेला घरघर लागली असून एकामागून एक धक्के मिळत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचे कट्टर कार्यकर्ते सोडून जात असल्याने आता सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चलबिचल सुरू झाली आहे. मागील आठवड्यात विधानसभा प्रवक्ते अमोल पाटील यांच्यानंतर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही असा पक्ष प्रवेश म्हणजे कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाच्या महिला संघटक, आमदार थोरवे यांची बहिण सुरेखा खेडकर यांनी कर्जत-खालापूर मतदार संघाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. ( MLA Mahendra Thoraven’s sister leaves support; joins Nationalist party) त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला तसेच आमदार महेंद्र थोरवे यांना पवारांनी जोरदार धक्का दिला आहे.

या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादीचे नेते भगवान भोईर, खालापूर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भगवान चंचे, खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, खोपोलीचे शहराध्यक्ष मनेश यादव, जेष्ठनेते शरद कदम, एच.आर. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे, वैभव भोईर, उध्दव देशमुख, बंधू मलबारी, खोपोली महिला अध्यक्षा वैशाली जाधव, कर्जत विभाग महिला अध्यक्षा रंजना धुळे, माजी नगरसेवक तुकाराम साबळे, रमेश जाधव, संतोष चिले, भास्कर लांडगे, अमोल पाटील, बाबू पोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -