Friday, April 26, 2024
घरमानिनीReligiousवैवाहिक जीवनात सतत कलह होतात? 'हा' उपाय नक्की करा

वैवाहिक जीवनात सतत कलह होतात? ‘हा’ उपाय नक्की करा

Subscribe

नारळ फक्त हिंदू धर्मातच नाही तर ज्योतिष शास्त्रात देखील महत्वपूर्ण मानला जातो. नारळाचे उपाय करून आपण आपल्या दुःखांवर मात करू शकतो

हिंदू धर्मात नारळाला सर्वश्रेष्ठ मानले आहे, प्रत्येक पूजेत नारळाला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळेच नारळाला हिंदू धर्मात श्रीफळ देखील असे देखील नाव प्राप्त झाले आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी हिंदू धर्मात नारळ वाढवण्याची प्रथा आहे. असं म्हणतात की, नारळ वाढवून शुभ कार्य चालू केल्याने कामात यश प्राप्त होते. मात्र नारळ फक्त हिंदू धर्मातच नाही तर ज्योतिष शास्त्रात देखील महत्वपूर्ण मानला जातो. नारळाचे उपाय करून आपणं आपल्या दुःखांवर मात करू शकतो. तसेच आपली आर्थिक परिस्थती देखील सुधारू शकतो.

नारळाचे चमत्कारी उपाय

Importance of Coconut During Puja Rituals in Temples

- Advertisement -

 

  • यश प्राप्त करण्यासाठी

तुमच्या सर्व कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील तर एका लाल कपड्यामध्ये एक नारळ बांधून घराच्या मुख्य दाराच्या आतल्या बाजूला टांगून ठेवा. या उपायाने घरातील नकारात्नकता दूर होईल आणि कामात यश मिळेल.

- Advertisement -
  • धन, दौलत प्राप्त करण्यासाठी

धन, दौलत प्राप्त करण्यासाठी गुरूवारच्या दिवशी एका पिवळ्या कपड्यामध्ये नारळ, पिवळे फूल, हळदीची गाठ, पिवळी मिठाई हे सर्व बांधून भगवान विष्णूंना अर्पण करा. हा उपाय प्रत्येक गुरूवारी करावा.

Know Why Is The Coconut Fruit Considered Holy And Is Offered To Gods- My  Jyotish

  • शनी दोषापासून सुटका करण्यासाठी

तुमच्या कुंडलीत असलेल्या शनी दोषामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शनी दोषामुळे तुम्हाला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. या सर्व पीडा कायमच्या दूर करण्यासाठी शनिवारच्या दिवशी एक नारळ वाहत्या नदीमध्ये सोडा, तसेच हा उपाय करताना ‘ॐ रामदूताय नमः’ या मंत्राचा जप करा आणि तुमची संकटं दूर होतील अशी प्रार्थना करा.

  • वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी

तुमच्या वैवाहिक आयुष्यात वारंवार कलह निर्माण होत असतील तर, देवघरात एकाक्षी नारळ ठेवा. तसेच दररोज या नारळाची पूजा करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल.


हेही वाचा :

Vastu Tips : सतत आजारपण सुरु आहे? ‘हे’ वास्तुदोष करा दूर

- Advertisment -

Manini