घरदेश-विदेशLok Sabha : पारंपरिक जागेवर इज्जत राखणे कठीण झाल्यामुळेच...; मोदींनी राहुल गांधींवर...

Lok Sabha : पारंपरिक जागेवर इज्जत राखणे कठीण झाल्यामुळेच…; मोदींनी राहुल गांधींवर साधला निशाणा

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. केरळमधील पलक्कड येथे मोदींनी आज जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी माकप आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

पलक्कड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. केरळमधील पलक्कड येथे मोदींनी आज जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी माकप आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Prime Minister Narendra Modi targets Rahul Gandhi)

राहुल गांधींचे नाव न घेता मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला उत्तर प्रदेशातील आपल्या पारंपरिक जागेवर इज्जत राखणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांनी केरळमध्ये आपला नवीन तळ बनवला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने देशविरोधी प्रवृत्तींबद्दल देशात बंदी घातलेल्या संघटनेच्या राजकीय शाखेशी मागच्या दाराने करार केला आहे.खरं तर काँग्रेसचा राजकुमार केरळच्या जनतेकडे फक्त मतं मागणार, पण तो तुमच्या प्रश्नांबद्दन आणि तुमच्या बाजूने एक शब्दही बोलणार नाही, असा घणाघात मोदींनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : तामिळनाडूत राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती; वाचा नेमकं प्रकरण काय?

मोदींनी डाव्या सरकारांवर निशाणा साधला

नरेंद्र मोदी म्हणाले की, केरळच्या लोकांनी एलडीएफ आणि यूडीएफपासून सावध राहावे, कारण केरळमध्ये काँग्रेसने डाव्यांना ‘दहशतवादी’ म्हटले आहे. पण दिल्लीत काँग्रेस आणि हे ‘दहशतवादी’ एकत्र बसतात, एकत्र जेवतात आणि निवडणुकीची रणनीती बनवतात. आज केरळमध्ये राजकीय हत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कॉलेज कॅम्पस हे समाजकंटकांचे केंद्र बनले आहेत. जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांना सरकारी संरक्षण मिळत आहे. तसेच LDF-UDF केरळमधील परिस्थिती बिघडवत आहेत, असा आरोपही मोदींनी केला.

- Advertisement -

काँग्रेसने भारताला दुबळे राष्ट्र म्हणून जगासमोर मांडले

काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, एनडीए सरकारच्या काळात गेल्या 10 वर्षांत जागतिक व्यासपीठावर भारताचा दर्जा कसा वाढला हे केरळच्या जनतेने पाहिले आहे. काँग्रेसने त्यांच्या काळात भारताला दुबळे राष्ट्र म्हणून जगासमोर मांडले होते, पण आम्ही भारताला पूर्वीपेक्षा मजबूत केले आहे. त्यामुळे येत्या काळात केरळला सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल याची आम्ही खात्री करू, द्रुतगती मार्ग आणि महामार्ग बांधून आम्ही पायाभूत सुविधा मजबूत करू, केरळमध्ये हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे एक मोठे नेटवर्क देखील स्थापन करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राणे की सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीकडून कोणाची लागणार लॉटरी?

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -