सकाळचा नाश्ता सर्वोत्तम मानला जातो. शरीराला योग्य आहार आणि पोषण न मिळाल्याने बरेचजण गंभीर आजारांना बळी पडतात. नाश्ता वेळेत न केल्यास एनर्जी लेव्हल डाउन होते. साधारण सकाळी 7 ते 10 या वेळेत बरेच लोक नाश्ता करतात आणि हीच नाश्त्याची योग्य वेळ आहे असा अनेकांचा समज आहे. मात्र, नाश्त्याची योग्य वेळ नेमकी कोणती हे 90% लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.
नाश्ता करण्याची योग्य वेळ?
- सकाळी योग्य वेळी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या शरीराला योग्य वेळी पुरेसी ऊर्जा मिळाली नाही, तर तुम्हाला सकाळपासूनच थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
- सकाळी 7 ते 8 ही वेळ नाश्ता करण्याची उत्तम वेळ मानली जाते.
- तसेच या कालावधीत तुम्ही नाश्ता करू शकत नसल्यास, सकाळी 10 वाजण्यापूर्वी करा.
- रात्रीच्या जेवणानंतर 8 तासांच्या गॅपमुळे आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि सकाळी ग्लुकोजची पातळी सहसा कमी असते.
- नाश्ता केल्याने आपली पचनक्रिया सक्रिय होते आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळते.
- नाश्त्यात फळे, भाज्या आणि तृणधान्ये घेतल्यास शरीराला फायबर मिळते जे पचनासाठी चांगले असते.
- हेल्द एक्सपर्ट्सच्या, जर तुम्ही उशिरा उठत असाल तर, झोपेतून उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करणे ही सर्वोत्तम वेळ आहे.
- नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्ससुद्धा खाऊ शकता. फळ आणि भाज्यांची स्मूदी, अंडी यांचादेखील समावेश तुम्ही नाश्त्यात करू शकता.
- सकाळी नाश्ता खाल्ल्याने भूक कमी होते, ज्यामुळे तुमचे जेवण नीट होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.