घरमहाराष्ट्रहसन मुश्रीफांसह 8 मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे; विजय वडेट्टीवारांची मागणी

हसन मुश्रीफांसह 8 मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे; विजय वडेट्टीवारांची मागणी

Subscribe

येत्या 15 दिवसांत राज्यातील सरकारने मंत्रिमंडळात असणाऱ्या 9 भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा 15 दिवसांनंतर त्यांच्याबाबतीतले भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही सादर करू, असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई: येत्या 15 दिवसांत राज्यातील सरकारने मंत्रिमंडळात असणाऱ्या 9 भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा 15 दिवसांनंतर त्यांच्याबाबतीतले भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही सादर करू, असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, ज्या मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत अशा नेत्यांना मंत्रिमंडळातून काढावे. (8 ministers must be sacked including Hasan Mushrif Demand of Vidhan sabha opposition leader Vijay wadettivar )

नुकतंच कोर्टानं हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुश्रीफांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. असं असतानाच आता विरोधी पक्षांकडून मुश्रीफांसह अन्य 8 मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

वडेट्टीवार म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए कोर्टानं अत्यंत गंभीर स्वरुपाचे निरीक्षण नोंदवलं आहे. खरंतर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. आता या मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनिटसुद्धा ठेवू नये. सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. सरकारमधील आणखी नऊ मंत्र्यांना काढावंच लागेल, असं व़डेट्टीवार म्हणाले.

 नेमकं प्रकरण काय? 

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबाशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंट (CA) महेश गुरव याचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळला. त्यावेळी जमा केलेला पैसा मुश्रीफांच्या मुलांच्या कंपन्यात वळविला असल्याचे निरक्षण न्यायालयाने नोंदविले.

- Advertisement -

कोल्हापूर येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे. हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय यावर ईडीने यापूर्वीच छापे टाकले आहेत.

( हेही वाचा: थैल्या, आकडा, खोके या शब्दांभोवतीच… ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -