Friday, May 3, 2024
घरमानिनीHealthवयाच्या चाळीशीनंतर बेली फॅट असे करा कमी

वयाच्या चाळीशीनंतर बेली फॅट असे करा कमी

Subscribe

बदललेल्या लाइफस्टाइलमुळे खाण्यापिण्याच्या सवयीतही बदल झालेला दिसून येतो. दीर्घकाळ बसून राहणे, एक्सरसाइज न करणे, स्ट्रेस किंवा अन्य स्थितीत पोटाची चरबी वाढली जाते. वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत वजन कमी करणे अत्यंत सोप्पे असते. पण वयाच्या चाळीशीनंतर वजन कमी करणे मुश्किल होऊ शकते. अशातच बेली फॅट कमी कसे करायचे याचबद्दल जाणून घेऊयात.

वयाच्या चाळीनंतर पोटाची चरबी वाढण्याची कारणे
-वय
-हार्मोन
-मेनोपोज
-तणाव

- Advertisement -

बेली फॅट असे करा कमी
-आहारात प्रोटीनचे सेवन वाढवा
प्रोटीनचे सेवन वाढवल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. एका अभ्यासानुसार, जी लोक अधिक प्रोटीन खातात त्यांच्यामध्ये पोटाची चरबी कमी असते. मात्र असे न करणाऱ्यांमध्ये पोटाची चरबी अधिक दिसून येते. जर तुम्हाला पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर आहारात भरपूर प्रमाणात प्रोटीनचा समावेश करावा.

-अल्कोहोलचे सेवन करणे टाळा
जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर अल्कोहोलचे सेवन करणे टाळावे. यामुळे तुमचे वजन अधिक वाढले जाऊ शकते. अल्कोहोलमध्ये कॅलरीज अधिक असतात आणि अशातच वजन वेगाने वाढले जाते.

- Advertisement -

-मीठाचे सेवन कमी करा
मीठाचे सेवन कमी केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही अधिक मीठाचे सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल आणि बेली फॅट कमी करण्यासाठी मीठाचे सेवन कमी करावे.

-वजन कमी करण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटी करा
वजन कमी करायचे असेल तर शरीराची हालचाल होणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही वजन उचलता तेव्हा तुमच्या शरीरातील अधिक उर्जेचा वापर केला जातो. म्हणजेच तुमचे शरीर कॅलरी बर्न करेल. अशातच तुमचे वजनही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर दररोज थोडावेळतरी एखादी फिजिकल अॅक्टिव्हिटी जरूर करा.


हेही वाचा- महिलांमध्ये असंतुलित हार्मोनचे ‘हे’ आहेत संकेत

- Advertisment -

Manini