Saturday, April 13, 2024
घरमानिनीBeautyसनस्क्रिन चुकीच्या पद्धतीने वापरल्याने होतील 'या' समस्या

सनस्क्रिन चुकीच्या पद्धतीने वापरल्याने होतील ‘या’ समस्या

Subscribe

उन्हाळ्यात कडक उन्हापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण सनस्क्रिनचा वापर करतो. यामुळे आपल्या त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून दूर राहतो तसेच युवी किरणांपासून सनस्क्रिन आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करते. परंतु तुम्ही सनस्क्रिनचा अधिक वापर करत असाल किंवा चुकीच्या पद्धतीने वापर करत असाल तर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे एलर्जी, रॅशेज येणे, खाज येणे असा समस्या येऊ शकतात. सनस्क्रिनच्या चुकीच्या वापरामुळे तुमचे कशा प्रकारे नुकसान होऊ शकते याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • एक्ने आणि पिंपल्स


जर तुम्ही अधिक प्रमाणात सनस्क्रिनचा वापर करत असाल तर स्किनवर पिंपल्स येऊ शकतात. अशातच तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसारच सनस्क्रिनची निवड करा.

- Advertisement -
  • एलर्जी


सनस्क्रिनमध्ये असे काही केमिकल्स असतात जे सेंसिटिव त्वचेला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे त्वचेवर जळजळ, सूज येणे, रॅशेज किंवा खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. काही वेळेस ते बरे होण्यास ही खुप वेळ लागू शकतो.

  • डोळ्यांची जळजळ


डोळे हे अगदी संवेदनशील असतात. अशातच ते हार्श केमिकलच्या संपर्कात आल्यास त्यांची जळजळ होऊ शकते. अशातच सनस्क्रिन लावल्यानंतर डोळे लाल होणे किंवा चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते. असे झाल्यास चेहरा लगेच स्वच्छ करा आणि डोळे ही स्वच्छ धुवा.

- Advertisement -
  • केसांच्या मुळांच्या येथे पुटकुळं येणं


काही वेळेस सनस्क्रिन लावल्यानंतर केसांच्या येथे दुखण्यास सुरुवात होते. हेअर फॉलिक्समध्ये पस येऊ लागतो. हे संक्रमणाचे सुद्धा कारण ठरु शकतात. असे झाल्यानंतर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


हेही वाचा : 

पपईचा फेसपॅक लावल्यास चेहरा होईल तजेलदार

- Advertisment -

Manini